ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट-रोहित खेळणार नाहीत? जाणून घ्या मोठा खुलासा समोर!

विराट कोहली (Virat Kohli & Rohit Sharma) आणि रोहित शर्मा या दोन्ही खेळाडूंच्या पुनरागमनाची भारतीय चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. कसोटी आणि टी20 फॉरमॅटमधून त्यांनी निवृत्ती जाहीर केली आहे, आता फक्त वनडे सामने उरले आहेत ज्यामध्ये चाहते रोहित आणि विराटला खेळताना पाहू शकतील. अशा चर्चा सुरू आहेत की, चाहत्यांचे लाडके हे दोन्ही दिग्गज खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत परतू शकतात. या वर्षी टीम इंडिया फक्त 6 वनडे सामने खेळणार आहे.

पण, रोहित शर्मा आणि विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार नाहीत अशी चर्चा झाली. प्रत्यक्षात, सध्या भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया A टीम आली आहे. या दौऱ्यात ते 2 अनऑफिशियल कसोटी आणि 3 अनऑफिशियल वनडे सामने खेळणार आहेत. अलीकडेच बीसीसीआयने इंडिया A चा संघ जाहीर केला, पण त्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचं नाव नव्हतं.

त्यामुळे रोहित आणि विराट ऑस्ट्रेलिया A विरुद्धच्या मालिकेत दिसणार नाहीत. पण ही मालिका ऑस्ट्रेलियाच्या सीनियर टीमविरुद्ध नसून A टीमविरुद्ध आहे. दुसरीकडे, अजून ऑस्ट्रेलिया टूरसाठी भारतीय संघ जाहीर झालेला नाही. त्यामुळे, विराट आणि रोहित यांचा त्या मालिकेत समावेश होण्याची पूर्ण शक्यता आहे.

ऑस्ट्रेलिया A विरुद्धच्या अनऑफिशियल वनडे मालिकेसाठी निवडकर्त्यांनी दोन वेगवेगळे कर्णधार नियुक्त केले आहेत. पहिल्या सामन्यासाठी रजत पाटीदार (Rajat patidar) कर्णधार असेल. तर सध्या आशिया कप खेळत असलेला तिलक वर्मा (Tilak Verma) शेवटच्या दोन अनऑफिशियल वनडे सामन्यांसाठी कर्णधार असेल. ही मालिका 30 सप्टेंबर, 3 ऑक्टोबर आणि 5 ऑक्टोबर रोजी खेळली जाणार आहे.

भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाचा दौरा 19 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. या काळात टीम इंडिया 3 वनडे आणि 5 टी20 सामने खेळणार आहे. वनडे सामने 19, 23 आणि 25 ऑक्टोबर रोजी होणार असून, याच सामन्यांमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळताना दिसू शकतात.

Comments are closed.