बीसीसीआय आणि अपोलो टायर्स यांच्यात किती वर्षांचा करार झाला? किती कोटींमध्ये झाली डील फायनल, जाणून घ्या सविस्तर!

भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (BCCI) टीम इंडियाच्या जर्सीसाठी नवीन स्पॉन्सर निश्चित केला आहे. BCCI ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर अपोलो टायर्स (Apollo Tyres) सोबत करार निश्चित केला आहे. BCCI आणि Apollo Tyres यांच्यातील हा करार अडीच वर्षांचा आहे. टीम इंडियाच्या जर्सीवर Apollo Tyres चे नाव मार्च 2028 पर्यंत राहणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार ही डील सुमारे ₹579 कोटींमध्ये झाली आहे.

आशिया कपसाठी अपोलो टायर्स व्यतिरिक्त कॅनवा आणि (JK Cements) जे के सिमेंट्स ही नीलामीत सहभागी झाले आहेत. जेके सिमेंटने ₹477 कोटींची बोली लावली, तर कॅनवाने ₹544 कोटींची बोली लावली. पण BCCI ची डील अपोलो टायर्स सोबत ₹579 कोटींमध्ये फायनल झाली. यापूर्वी BCCI आणि Dream11 यांच्यातील करार 3 वर्षांचा आणि ₹358 कोटींचा होता.

टीम इंडियाच्या जर्सीवर आधी ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म Dream11 चे नाव होते. पण भारत सरकारने ऑनलाइन मनी गेमिंगसाठी नवीन कायदा केला आहे. या कायद्यामुळे ऑनलाइन मनी गेम चालवणे किंवा त्याचा प्रचार केल्यास दंड होऊ शकतो आणि दोषींना जेलची सजा देखील होऊ शकते. त्यामुळे BCCI ने Dream11 सोबतचा करार संपवला आणि नवी डील लवकरच केली.

बीसीसीआय आणि ड्रीम 11 (Dream11) यांच्यातील करार आशिया कप 2025च्या काही दिवस आधीच संपला होता. त्यामुळे आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या जर्सीवर कोणताही स्पॉन्सर दाखवला गेला नाही. BCCI ने टीम इंडियाचा स्पॉन्सर निवडण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर ठेवली होती आणि आजच अपोलो टायर्सचे नाव फायनल केले आहे.

Comments are closed.