Asia Cup: 'हँडशेक' वादानंतर पाकिस्तानी कर्णधाराने सामन्याआधी घेतला हा महत्त्वाचा निर्णय

Asia Cup 2025: (14 सप्टेंबर) रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात भारतीय संघाने जबरदस्त प्रदर्शन करत सामना 7 विकेटने जिंकला. टॉसच्या वेळी कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा यांच्याशी हात मिळवणे साफ नाकारले. सामन्यानंतरही भारतीय खेळाडूंनी हात मिळवण्यापासून दूर राहिले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याची तक्रार आयसीसीकडे केली आणि सामन्याचा रेफरी आशिया कपमधून वगळावा अशी मागणी केली. पण आयसीसीने पाकिस्तानची ही मागणी नाकारली. त्यानंतर आता पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाने मोठा निर्णय घेतला आहे.

भारताशी सामना झाल्यानंतर पाकिस्तानला आपला पुढील सामना 17 सप्टेंबरला युएई विरुद्ध खेळायचा आहे. सुपर-4 मध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणे अत्यावश्यक आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या कर्णधारासह संपूर्ण संघाने मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने 16 सप्टेंबरला होणारी प्रेस कॉन्फरन्स रद्द केली आहे. भारतीय संघाने या ग्रुपमधून सुपर-4 साठी आधीच क्वालिफाय केले आहे.

आशियाई क्रिकेट काउन्सिल आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी भारत-पाकिस्तान सामन्याचा रेफरी अँडी पाइक्रॉफ्ट यांना काढून टाकण्याची मागणी केली होती. पण आयसीसीने पाकिस्तानची मागणी मान्य करण्यास नकार दिला. पाकिस्तानी खेळाडूंनी भारताशी हात न मिळवणे या गोष्टीने शेजारच्या देशाला समाधान मिळालेले नाही. पाकिस्तानचे अनेक माजी खेळाडू हे खेळभावनेस विरुद्ध असल्याचे सांगत आहेत.

भारत-पाकिस्तान सामना आशिया कप 2025 मध्ये पुन्हा पाहायला मिळू शकते. पाकिस्तानने जर आपल्या पुढील सामन्यात युएईला हरवले आणि सुपर-4 मध्ये पोहोचला, तर शेजारच्या देशाचा सामना पुन्हा भारताशी होऊ शकतो. दोन्ही देश 21 सप्टेंबरला समोरासमोर येऊ शकतात.

Comments are closed.