अचानक पैशांची गरज लागल्यास कोणतं कर्ज फायदेशीर ठरत? वैयक्तिक कर्ज की टॉप अप लोन? जाणून घ्या

नवी दिल्ली : अनेकांना आर्थिक अडचणींमुळं वैयक्तिक कर्ज काढावं लागतं. एखाद्या व्यक्तीचं अगोदर काढलेलं वैयक्तिक कर्ज सुरु असताना पुन्हा एकदा पैशांची गरज निर्माण झाल्यास आणखी एका वैयक्तिक कर्ज काढंव लागतं. याशिवाय आणखी एक पर्याय असतो तो म्हणजे अगोदर सुरु असलेल्या पर्सनल लोनवर टॉप अप लोन काढावं लागतं. या दोन्हीमध्ये फायदे आणि नुकसान देखील असतं.

टॉपअप लोन म्हणजे काय?

टॉप अप लोन म्हणजे असं कर्ज जे तुमच्या अगोदरच्या पर्सनल लोनवर बँक किंवा एनबीएफसीकडून ज्याची ऑफर दिली जाते. सामान्यपणे बँक किंवा एनबीएफसी चांगला क्रेडिट स्कोअर असणाऱ्या ग्राहकांना टॉप अप लोनची ऑफर करतात. जे कर्ज तुम्हाला पहिल्यापासून सुरु असलेल्या कर्जावर मिळतं. याचं कारण बँक किंवा एनबीएफसीकडे कर्जदाराची सर्व माहिती उपलब्ध असते. त्यामुळं टॉप अप लोन मंजूर होण्यास अधिक वेळ लागत नाही. याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे अगोदरच्या वैयक्तिक कर्जापेक्षा नव्या वैयक्तिक कर्जाचा व्याज दर कमी असतो.

नव्या वैयक्तिक कर्जाच्या अटी

तुम्हाला नव्या वैयक्तिक कर्जाची आवश्यकता असते. त्यावेळी नव्यानं कर्जासाठी अर्ज करावा लागतो. तुम्हाला एखाद्या बँक किंवा एनबीएफसीकडे वैयक्तिककर्जासाठी अर्ज करावा लागेल. यानंतर वित्तीय संस्था कर्जदाराची पात्रता पाहते. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर कर्जाचा अर्ज मंजूर होते. नव्या वैयक्तिक कर्जासाठी प्रोसेसिंग शुल्क द्यावं लागतं. यासाठी व्याजदर देखील जास्त असतो. हे कर्ज महाग असतं.

कर्ज घेण्यापूर्वी काय करावं?

जाणकारांच्या मते जर तुमचं अगोदरचं वैयक्तिक कर्ज सुरु असेल आणि वेळेवर ईएमआय भरत असाल आणि टॉप अप लोन पहिल्या व्याज दरापेक्षा कमी व्याज दरानं मिळेल. नवं वैयक्तिक कार्ज काढण्यापूर्वी बँकेसोबत टॉप अप कर्जाबाबत चर्चा केली पाहिजे, ज्या बँकेकडून पर्सनल लोन काढलं आहे त्यांच्यासोबत चर्चा करावी. बँक जर तुम्हाला टॉप अप लोन द्यायला तयार असेल तर किती रकमेचं कर्ज देते याची चौकशी केली पाहिजे. बँक देत असलेल्या कर्जामुळं तुमची गरज भागत नसल्यास नव्या वैयक्तिक कर्जाचा विचार केला पाहिजे.

क्रेडिट स्कोअरवर काय परिणाम होतो?

तज्ज्ञांच्या मते नव्या वैयक्तिक कर्ज किंवा टॉप अप लोनचा विचार करावा जेव्हा तुमच्यापुढं दुसरा कोणता पर्याय उपलब्ध नसेल. अधिक पर्सनल लोन किंवा टॉप अप लोनचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होतो. कर्जाची परतफेड जशी केली जाते त्याप्रमाणं क्रेडिट स्कोअर वाढत जातो.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.