कोकणातून अमेरिकेत होणारी मत्स्य निर्यात 40 टक्क्यांनी घटली; निर्यातदार आणि अमेरिकेतील खरेदीदारांमध्ये वाद

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानविरोधात पुकारलेल्या ‘टॅरिफ वॉर’मुळे कोकणातील मत्स्य निर्यात संकटात आहे. वाढीव टॅरिफ निर्यातदारांनी भरायचे की, त्याचा बोजा अमेरिकेतील खरेदीदारांवर टाकायचा यावरून वादाला तोंड फुटले आहे. ‘टॅरिफ वॉर’मुळे मासळीचे दर तब्बल 50 टक्क्यांनी वाढले असून मत्स्य निर्यात 40 टक्क्यांनी घटली आहे.
अमेरिकेत मासे निर्यात करणाऱ्या मिरजोळे येथील जिलानी मरीन प्रॉडक्ट कंपनीचे व्यवस्थापक अब्दुल नासार यांनी सांगितले की, टॅरिफमुळे अमेरिकेत निर्यात होणाऱ्या माशांच्या किमती 50 टक्क्यांनी वाढणार आहेत. त्या दरवाढीचा फटका अमेरिकेतील ग्राहकांना बसल्याने माशांची मागणी घटली आहे. रत्नागिरीतील गद्रे मरीन ही कंपनी राणीमासा, ढोमा, चोरबोंबील कोळंबीसारख्या माशांपासून फिशपेस्ट तयार करून विविध मत्स्य पदार्थ तयार करते. फिशपेस्ट तयार करून मत्स्य पदार्थ तयार करणारी गद्रे मरीन ही हिंदुस्थानातील पहिली कंपनी आहे. या कंपनीला टॅरिफचा फटका बसला असून त्याचा परिणाम ऑर्डरवर होण्याची भीती गद्रे मरीनने व्यक्त केली.
नव्या टॅरिफचा अमेरिकेतील ग्राहकांनाही त्रास होत आहे. अमेरिकेतील नागरिकांचा तिथल्या सरकारवरही दबाव आहे. त्यामुळे पुढील तीन महिन्यांत याबाबत योग्य निर्णय येईल अशी आशा आहे.
n दीपक गद्रे, संचालक, गद्रे मरीन, रत्नागिरी
टॅरिफमुळे माशांचे दर वाढले आहेत. टॅरिफचा हो बोजा निर्यातदारांनी उचलावा की तो खरेदीदारांनी ग्राहकांकडून वसूल करावा, याबाबत चर्चा सुरू असून लवकरच तोडगा निघेल.
एन दिनेश फजलानी, हार्बर एक्सपोर्ट, नेटे
Comments are closed.