अपग्रेड करण्यासाठी प्रचंड हेलिकॉप्टर
केंद्र सरकारचा निर्णय : एचएएलकडून होतेय निर्मिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय सैन्य आणि वायुदलाला आणखी सामर्थ्यशाली करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) भारताचे स्वदेशी लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर प्रचंडला अपग्रेड करणार आहे. या अपग्रेड हेलिकॉप्टरची मारक क्षमता आणि बचावाची क्षमता अनेकपटीने वाढविणार आहे.
सुमारे 62,700 कोटी रुपयांच्या या प्रकल्पात एचएएल 156 हेलिकॉप्टर्स निर्माण करणार असून यातील 90 सैन्यासाठी तर 66 वायुदलासाठी असतील. या हेलिकॉप्टर्सचा पुरवठा 2027-28 पासून सुरू होईल आणि 2030 पर्यंत पूर्ण होणार आहे.
एलसीएच प्रचंड हे भारताचे पहिले स्वदेशी कॉम्बॅट हेलिकॉप्टर असून ते एचएलएने डिझाइन आणि विकसित केले आहे. 1999 साली झालेल्या कारगिल युद्धावेळी पर्वतीय भागांसाठी अटॅक हेलिकॉप्टर्सची आवश्यकता जाणवली होती. एमआय-17 सारख्या यूटिलिटी हेलिकॉप्टर्सचा संघर्षात वापर करण्यात आला होता, परंतु त्याची क्षमता पुरेशी नव्हती.
प्रचंड हेलिकॉप्टरचा प्रोटोटाइप 2010 मध्ये रोलआउट झाला. 2022 मध्ये वायुदलाच्या ताफ्यात या हेलिकॉप्टरला औपचारिक स्वरुपात सामील करण्यात आले. आतापर्यंत 15 लिमिटेड सीरिज प्रॉडक्शन (एलएसपी) प्रचंड हेलिकॉप्टर्स पुरविण्यात आले आहेत. यातील 10 वायुदलाला तर 5 सैन्याला प्राप्त झाले आहेत. हे एअर-टू-एअर क्षेपणास्त्रs, रॉकेट्स आणि टॉरेट गनने युक्त आहे.
28 मार्च 2025 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीने 156 प्रचंड एलसीएचच्या ऑर्डरला मंजुरी दिली होती. एचएएलसोबत करारावर स्वाक्षरीही झाली आहे. चालू आर्थिक वर्षातील हा सर्वात मोठा संरक्षण करार आहे. या हेलिकॉप्टरची निर्मिती एचएएलच्या कर्नाटकातील प्रकल्पात होणार आहे. येथे दरवर्षी 30 हेलिकॉप्टर्स निर्माण करण्याची क्षमता आहे, तर प्रसंगी ही क्षमता 100 पर्यंत वाढविली जाऊ शकते.
7 नव्या यंत्रणा अन् 4 मोठे बदल
नव्या सीरिजच्या प्रचंडमध्ये 7 नव्या यंत्रणा आणि 4 प्रमुख अपग्रेड्स असतील, जे याला जगातील सर्वात घातक हेलिकॉप्टर्समध्ये बदलतील. हे अपग्रेड्स फायरपॉवर वाढवतील आणि शत्रूच्या विरोधात बचावाची क्षमता प्रदान करतील.
7 नव्या यंत्रणा…
लेझर-गायडेड रॉकेट : लेझरने निर्देशित, अचूक हल्ले करतील
न्युक्लियर डिटेक्शन क्षमता : आण्विक हल्ल्यांचा शोध लावण्यासाठी
डायरेक्टेड इन्फ्रारेड काउंटरमेजर्स : इन्फ्रारेड क्षेपणास्त्रांना विचलित करण्यासाठी
डाटा लिंक : सुरक्षित संचारासाठी, जे अन्य विमाने, ग्राउंड स्टेशन्सशी जोडेल
ऑब्स्टेकल अवॉइडेन्स सिस्टीम : अडथळ्यापांसून (पर्वत किंवा तारा) वाचण्यासाठी ऑटोमॅटिक सेंसर
मॉडर्न इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सिस्टीम : शत्रूचा रडार जमा करत क्षेपणास्त्रांना चकविणार
स्वदेशी एअर-टू-ग्राउंड क्षेपणास्त्र : शत्रूच्या ग्राउंड टारगेट्सचा अचूक लक्ष्यक्षेद करण्यासाठी
4 प्रमुख अपग्रेड…
अॅडव्हान्स्ड आर्मर : शत्रूच्या शस्त्रास्त्रांपासून अधिक सुरक्षा
प्रभावी इंजिन अन् एवियोनिक्स : उंचीवर अधिक शक्ती अन् अचूकता
इलेक्ट्रो-ऑप्टिकल पॉड : प्रभावी सेंसरमुळे रात्री किंवा खराब हवामानात देखरेख
हेल्मेट-माउंटेड पॉइंटिंग सिस्टीम : पायलट हेल्मेटद्वारेच शस्त्रास्त्रs निर्देशित करू शकेल, यामुळे लक्ष्यभेद करणे सोपे ठरणार
Comments are closed.