तुमचं बाळ बसायला तयार आहे हे कसं ओळखाल? जाणून घ्या महत्वाची चिन्हं
घरात बाळ आल्यावर प्रत्येक आई-वडिलांसाठी त्याची प्रत्येक छोटी प्रगती ही आनंदाची गोष्ट असते. बाळाने पहिल्यांदा उलटं फिरणं, पहिलं हसणं किंवा पहिलं पाऊल टाकणं यासारखी क्षणं घरच्यांना नेहमीच लक्षात राहतात. त्याचप्रमाणे बाळाने बसायला सुरुवात करणं हेही खूप महत्वाचं टप्पं असतं. मात्र, अनेकदा आपण बाळ खूप लहान असतानाच त्याला बसवायचा प्रयत्न करतो. यामुळे त्यांच्या पाठीच्या कण्यावर ताण येऊ शकतो. त्यामुळे बाळ खरंच बसायला तयार आहे का हे योग्य वेळी ओळखणं महत्त्वाचं आहे. (how to know when baby ready to sit)
बाळ बसायला तयार असल्याची लक्षणं
1) नेक कंट्रोल (मान धरू शकणं):
बाळाचं मान धरायचं सामर्थ्य पूर्णपणे विकसित झालं पाहिजे. जर अजूनही मान ढळत असेल तर बाळ बसण्यासाठी तयार नाही.
2) ट्रायपॉड पोझिशन:
साधारण 6 ते 7 महिन्यांत बाळ स्वतःला पुढे हात ठेवून टेकवून बसण्याचा प्रयत्न करतं. यालाच ट्रायपॉड पोझिशन म्हणतात.
3) स्वतः उठायचा प्रयत्न:
जर तुम्ही बाळाचे हात पकडले तर ते स्वतःहून बसण्याचा प्रयत्न करतं. हे त्याच्या स्नायूंच्या बळकटपणाचं चिन्ह आहे.
4) 8 ते 9 महिने – न पकडता बसणं:
या वयात बहुतेक बाळं कोणाच्या मदतीशिवाय स्वतः बसू लागतात.
टम्मी टाइम का महत्वाचं?
बाळ बसायला शिकण्याआधी त्याला टम्मी टाइम देणं खूप गरजेचं आहे.
– यामुळे नेक मसल्स आणि बॅक मसल्स मजबूत होतात.
– बाळाचं हेड कंट्रोल नीट विकसित होतं.
– हातावर जोर देणं, खेळणी पकडणं यामुळे हात आणि खांद्याचे स्नायू ताकदवान होतात.
– हळूहळू त्यांना बसण्यासाठी आत्मविश्वास मिळतो.
लक्षात ठेवा
बाळाचं प्रत्येक टप्प्याचं विकास वेगळा असतो. काही बाळं लवकर बसतात तर काही थोड्या उशिरा. त्यामुळे घाई न करता बाळाला नैसर्गिकरीत्या शिकू द्या. जबरदस्ती बसवल्यास कण्यावर ताण येऊ शकतो.
बाळ बसायला सुरुवात करणं हा त्यांच्या विकासाचा एक महत्वाचा टप्पा आहे. त्यासाठी मान धरायची क्षमता, स्नायूंची ताकद आणि टम्मी टाइम यांचा मोठा वाटा असतो. योग्य वेळ ओळखून बाळाला मदत केल्यास त्याचा शारीरिक विकास आरोग्यदायी पद्धतीने होतो.
Comments are closed.