देहरादुनच्या सहस्रधाना मधील ढग
हिमाचलच्या शिमला येथे भूस्खलन : मंडीमध्ये प्रचंड नुकसान
वृत्तसंस्था/ देहरादून
उत्तर भारतात मंगळवारी अतिवृष्टीने पुन्हा मोठे नुकसान घडवून आणले आहे. उत्तराखंडच्या देहरादून येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळ सहस्त्रधारा येथे ढगफूटीमुळे पूर आला आहे. या पुरात अनेक दुकाने वाहून गेली असून कित्येक जण बेपत्ता झाले आहेत. देहरादून येथे 8 जणांचा मृत्यू तर 4 जण बेपत्ता झाल्याचे समजते. तर हिमाचलप्रदेशच्या धरमपूर, मंडी आणि शिमला येथे अतिवृष्टीमुळे नागरी वस्ती पाण्याखाली गेली असून वाहने वाहून गेली आहेत.
देहरादूनचे सहस्त्रधारा हे लोकप्रिय पर्यटनस्थळ असून तेथे लोक गरम पाण्याचे झरे आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पोहोचतात. परंतु मंगळवारी येथे ढगफूटी झाल्यावर मोठा पूर आला. रात्रभर झालेल्या पावसामुळे तमसा नदीने उग्र रुप धारण केल्याने अनेक दुकाने आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. देहरादूनच्या रस्त्यांवर वाहने वाहून जात असल्याचे दृश्य दिसून आले. जिल्हा प्रशासनाने बचाव अभियान सुरू केले असून एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने यंत्रसामग्रीच्या मदतीने स्थानिक लोकांना सुरक्षितठिकाणी हलविले आहे. अतिवृष्टीमुळे देहरादूनच्या सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. प्रशासन हाय अलर्टवर असून बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे.
हिमाचलमध्येही अतिवृष्टी
हिमाचल प्रदेशातही मान्सूनने परतीच्या प्रवासातही मोठे नुकसान केले आहे. मंडी जिल्ह्यातील धरमपूर येथे ढगफूटी झाल्याने सोन ख• नदीने उग्र रुप धारण केले. तेथील बसस्थानक पूर्णपणे पाण्याखाली गेले असून बससमवेत अनेक वाहने वाहून गेली. मंडी आणि आसपासच्या भागांमध्ये भूस्खलन आणि पूरामुळे मोठी हानी झाली आहे. मंडीमध्ये झालेल्या भूस्खलनात एकाच परिवाराचे 5 सदस्य ढिगाऱ्याखाली चिरडले गेले. यातील 3 जणांचा मृत्यू झाला तर 2 जणांना वाचविण्यात आले. सुमा ख• नदीच्या प्रवाहात दोन जण वाहून गेले असून यातील एकाचा मृतदेह हाती लागला आहे. तर दुसऱ्या इसमाचा शोध घेतला जात आहे.
Comments are closed.