परफ्यूम कपड्यांवर लावावा की त्वचेवर? 99 % लोकांना माहित नाही योग्य पद्धत
सकाळी घराबाहेर पडताना परफ्यूम लावणे हा जवळजवळ प्रत्येकाच्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग असतो. अनेकदा आपण परफ्युम हा त्वचेवर लावावा की कपड्यांवर याबाबत गोंधळात असतो. बहुतेक जण परफ्युम स्प्रे समजून वापरतात. मात्र परफ्युम नेमका त्वचेवर लावावा की कपड्यांवर? तसेच परफ्युमचा सुघंद दीर्घकाळ टिकवण्यासाठी काय करावे? आपण जाणून घेऊया…
परफ्यूम वापरण्याची योग्य पद्धत कोणती?
- परफ्युम थेट हाताच्या मनगटावर, मान किंवा कानाच्या मागे लावा. पण लक्षात ठेवा जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे आधी थोडासा परफ्यूम लावून पॅचटेस्ट करून घ्या.
- परफ्युमचा सुगंध दीर्घकाळ टिकवण्यासाठी कपड्यांवर स्प्रे करा, मात्र हे करताना डाग पडण्याची शक्यता असते. अशा वेळी कापड्याच्या छोट्याशा भागावर परफ्युम स्प्रे करून पाहा.
- प्रथम बॉडी परफ्यूम किंवा डिओडोरंट त्वचेवर लावा, नंतर कपड्यांवर परफ्युम स्प्रे करा. यामुळे सुगंध दिवसभर टिकतो.
- आता तुम्ही जर थेट त्वचेवर परफ्यूम लावत असाल तर त्याचे फायदे आणि नुकसान माहित असणे गरजेचे आहे.
फायदा
- शरीराच्या उष्णतेमुळे परफ्यूमचा सुगंध सक्रिय होतो, ज्यामुळे तो जास्त काळ टिकतो.
- परफ्यूम त्वचेवर लावल्याने सुगंध हळूहळू वाढत जातो.
नुकसान
- जर तुमची त्वचा संवेदनशील असेल, तर परफ्यूममध्ये असलेल्या अल्कोहोल आणि रसायनांमुळे ऍलर्जी, खाज किंवा जळजळ होऊ शकते.
- काही परफ्यूम सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर काळे डाग देखील निर्माण करू शकतात.
- आता तुम्ही जर कपड्यांवर परफ्यूम लावत असाल तर त्याचे फायदे आणि नुकसान माहित असणे गरजेचे आहे.
फायदा
- कपड्यांना परफ्यूम लावल्याने सुगंध जास्त काळ टिकतो, विशेषतः कापड हेव्ही असेल तर.
- तसेच कपड्यांवर परफ्यूम लावल्याने त्वचेच्या प्रतिक्रियेचा धोका होत नाही.
नुकसान
- काही परफ्यूम कपड्यांवर लावल्यास डाग दिसतात. धुतल्यावर देखील कपड्यांवरील डाग जात नाहीत.
- त्वचेवर परफ्युम लावल्यास दीर्घकाळ टिकतो. कपड्यांवर परफ्युम लावल्यास जास्त काळ टिकत नाही.
Comments are closed.