सर्व्हिस रोडचे विलिनीकरण न थांबवल्यास उद्रेक, अवजड वाहनांची बंदी ही धूळफेक; राजन विचारे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

घोडबंदर रोडवरील सर्व्हिस रोडचे महामार्गामध्ये विलिनीकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे, पण त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका असून वाहतूककोंडी सुटण्याऐवजी आणखी वाढेल. त्यामुळे हे विलिनीकरण तत्काळ थांबवा, अन्यथा ठाणेकरांचा प्रचंड उद्रेक होईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी सरकारला दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात पत्र पाठवले असून अवजड वाहनांच्या बंदीचे आदेश म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचेही त्यात नमूद केले आहे.

चुकीच्या निर्णयांमुळे रोज घोडबंदर येथील रहिवाशांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. खासदार राजन विचारे यांनी या प्रश्नाकडे थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहून त्यांचे लक्ष वेधले आहे. वाहतूककोंडी व चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या सर्व्हिस रोडच्या विलिनीकरणाकडे प्रशासन गंभीर नसल्याने या विषयामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे असे विचारे यांनी सांगितले.

Comments are closed.