Beauty Tips: ब्रॉड आयब्रोजसाठी ट्राय करा हे घरगुती उपाय

आजकाल प्रत्येकालाच ब्रॉड आणि जाड आयब्रोज पाहिजे असतात. पण अनेक महिलांच्या भुवया या पातळ असतात. तसेच सतत थ्रेडिंग, वॅक्सिंग किंवा हार्मोनल बदलांमुळे कालांतराने त्या पातळ होतात. मग अशा वेळी काय करावे हे समजत नाही. आजकाल बाजारात ब्रॉड आयब्रोजसाठी ऑइल उपलब्ध असतात. पण खर्च करण्यापेक्षा तुम्ही काही घरगुती उपाय करून जाड आयब्रोज मिळवू शकता.

एरंडेल तेल
एरंडेल तेल तुमच्या भुवया जाड करण्यासाठी प्रभावी उपाय आहे. यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी एरंडेल तेलाने भुवयांना हलक्या हाताने मालिश करा. यामध्ये ओमेगा-६ फॅटी अॅसिड असतात, ज्यामुळे केसांची वाढ होते.

नारळ तेल आणि लिंबाचा रस
लिंबाच्या रसाचे काही थेंब 1 चमचा नारळ तेलात मिसळा आणि दिवसातून एकदा भुवयांवर लावा. हे तुमच्या भुवयांच्या मुळांना मजबूत करते.

कोरफडीचे जेल
कोरफडीचे जेल हे प्रत्येक महिलेच्या ब्युटी प्रोडक्ट्समध्ये असतेच. हेच जेल भुवयांसाठी तुम्ही वापरू शकता. दिवसातून दोनदा कोरफडीचे जेल थेट तुमच्या भुवयांना लावा. ते केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते.

तात्पुरते उपाय
वरील सर्व उपाय केल्यावर परिणाम काही दिवसांनी दिसतात. मात्र जर तुम्हाला तात्पुरते ब्रॉड आयब्रोज हवे असतील तर बाजारात आयब्रो पेन्सिल उपलब्ध आहेत. याचा वापर करून तुम्ही तुमच्या पातळ भुवयांना चांगले सेट करू शकता.

Comments are closed.