पाहणीसाठी आलेल्या सरकारी अधिकाऱ्याने गावकऱ्यांसमोर अपमान केला, शेतकऱ्याने विहिरीत उडी मारुन आयु

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar Crime News) अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतात नुकसानीचा पंचनामा सुरू असतानाच शेतकऱ्याने महसूल अधिकाऱ्यांसमक्ष विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. पैठण तालुक्यातील खादगाव येथील घटना असून, संजय शेषेराव कोहकडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मराठवाड्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय. छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar Crime News) पैठण तालुक्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतात अक्षरशः पाणी तुंबलं आहे.(Chhatrapati Sambhajinagar Crime News)

दरम्यान पैठण तालुक्यातील खादगाव येथील शेतकरी संजय कोहकडे यांच्या शेतात देखील पाणी तुंबलं होतं. बाजूच्या शेतातून आणि नाल्यातून शेतात पाणी येत असल्यामुळे त्यांनी पाणी बंद केले होते. दरम्यान या भागात नुकसानीच पाहणी करण्यासाठी मंडळ अधिकारी शुभांगी शिंदे आणि तलाठी लक्ष्मीकांत गोजरे हे घटनास्थळी आले असताना त्यांच्या समोर संजय यांनी आपली व्यथा मांडली. पण संजय यांची बाजू जाणून न घेता मंडळ अधिकाऱ्याने संजय यांना सर्वांसमोर सुनावले. गावकऱ्यांसमोरच अधिकाऱ्यांनी झापल्याने संजय यांना अपमान सहन झाला नाही. त्यांनी पंचनाम्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोरच शेतातील विहिरीत उडी घेतली आणि आपलं जीवन संपवलं.(Chhatrapati Sambhajinagar Crime News)

दोन्ही बाजूंनी नालीचे खोदकाम झाल्याने त्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे शेतात पाणी साचू लागले. संजय यांनी याबाबत अनेकदा महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पण दखल घेण्यात आली नव्हती, पण अतिवृष्टी झाल्याने मंगळवारी अधिकारी पंचनामा करण्यासाठी गावात पोहचले असताना कोहकडे यांनी आपली व्यथा सांगितली. पण अधिकारी ऐकून घेण्यास तयार नव्हते. यावेळी संजय यांच्या पत्नी आणि त्यांचे आई, भाऊ देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. संपूर्ण कोहकडे कुटुंब या अधिकाऱ्यांना विनवणी करत होते, पण अधिकारी आपला आडमुठापणा सोडायला तयार नव्हते.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, कोहकडे यांच्या शेतात शेजारच्या नाल्याचे आणि शेतांचे पाणी साचले होते. दोन्ही बाजूंनी नाले खोदल्यामुळे शेतात जाण्याचा मार्ग बंद झाला होता, त्यामुळे पाणी बाहेर काढणे अशक्य झाले. यासंदर्भात त्यांनी अनेकदा महसूल विभागाकडे तक्रारी केल्या होत्या, मात्र काहीही कार्यवाही झाली नव्हती.मंगळवारी पंचनामा करण्यासाठी मंडळ अधिकारी शुभांगी शिंदे आणि तलाठी लक्ष्मीकांत गोजरे घटनास्थळी आले. त्यावेळी संजय यांनी आपली व्यथा सांगितली. परंतु अधिकारी त्यांच्या अडचणी ऐकून घेण्याऐवजी सर्वांसमोर उलट त्यांनाच सुनावले. गावकऱ्यांसमोर झालेला हा अपमान संजय कोहकडे सहन करू शकले नाहीत. त्यांनी पत्नी, आई व भावाच्या उपस्थितीतच शेतातील विहिरीत उडी घेतली आणि आत्महत्या केली.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकऱ्यांच्या समस्यांकडे अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने पाहण्याची मागणी होत आहे.

https://www.youtube.com/watch?v=ehn5y2qbaas

आणखी वाचा

Comments are closed.