मोदींच्या वाढदिवशी शिवसेनेचे अनोखे आंदोलन, ‘एक पेढा भ्रष्टाचाराचा’ देत सरकारला झोंबता हल्ला!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या पुणे शहराच्या वतीने कसबा गणपती येथे अनोखे आंदोलन करण्यात आले. सरकारच्या चुका व नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी ‘एक पेढा भ्रष्टाचाराचा, एक पेढा मत चोरीचा, एक पेढा खड्ड्यांचा, एक पेढा महागाईचा’ अशा घोषणा देत पेढे आणि गाजर वाटप केले.

शिवसेनेने आयोजित केलेल्या या आंदोलनाला मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि नागरिकांचे उपस्थिती होती. कसबा गणपतीची आरती करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ‘मोदींना सुबुद्धी मिळावी आणि देशाचे भले व्हावे’ अशी प्रार्थना व्यक्त करण्यात आली. एक पेढा भ्रष्टाचाराचा… एक पेढा महागाईचा… जनता हैराण, मोदी पायउतार व्हा. अशा घोषणा देत नागरिकांना पेढे वाटण्यात आले.

शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले, भाजप ही जुमला पार्टी बनली असून मतदारांची फसवणूक झाली आहे. देशात महागाईने उच्चांक गाठलेला आहे, पुणेकर खड्ड्यांनी हैराण आहेत, मत चोरी सुरू आहे आणि भ्रष्टाचारी आमदार सत्तेचा मलिदा खात आहेत. ‘भ्रष्टाचार मुक्त भारत’ ही घोषणा फसवी ठरली आहे. नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मोदींनी सत्तेवरून पायउतार व्हावे हीच आमची मागणी आहे.

या आंदोलनाला शहरप्रमुख संजय मोरे, उपशहरप्रमुख गजानन थरकुडे, भरत कुंभारकर, प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत, कार्यालयीन सचिव मकरंद पेटकर, संघटक राजेंद्र शिंदे, किशोर रजपूत संदीप गायकवाड, विभाग प्रमुख मुकुंद चव्हाण राजेश मोरे चंदन साळुंखे हेमंत यादव निलेश वाघमारे नंदू येवले संतोष भुतकर अनिल परदेशी गिरीश गायकवाड रुपेश पवार दत्ता घुले ज्ञानंद कोंढरे शैलेश जगताप विकी धोत्रे नागेश खडके विलास कथलकर रमेश परदेशी सूर्यकांत पवार अमोल घुमे सचिन चिंचवडे जुबेर शेख नितीन निगडे पंढरीनाथ कांबळे अभिषेक जगताप हरिश्चंद्र सपकाळ संदीप महापदी विजय रावडे नितीन रावळेकर विकास राऊत बाळासाहेब गरुड सोनू पाटील अंकित अहिरे अनिल जाधव राहुल शेडगे बकुळ दाखवे, पंकज बरीदे अमित जाधव जितेंद्र निजामपूरकर हर्षद बडगुजर प्रमोद गाढवे, संजय वाल्हेकर शिवप्रसाद जठार शिरीष कोल्हटकर मोहन धामणकर सुरज मोराळे मोहन पांढरे प्रमोद पारधे निखिल खोडे नितीन दलभंजन मिलिंद पतकी युवा सेनेचे शहर संघटक सनी गवते सोहम जाधव परेश खांडके चिंतामण मुंगी अक्षय रावळ मिरज नांगरे सुरेश आढाव

महिला आघाडीच्या पद्मा सोरटे निकिता मारटकर स्वाती कथलकर अमृत पठारे सुनिता खंडाळकर जयश्री भंडगे रोहिणी कोल्हाळ वैशाली दारवटकर विजया मोहिते रोहिणी मडोळे मृण्मयी लिमये स्मिता पवार महिला आघाडी व युवा सेनेचे कार्यकर्ते तसेच शेकडो शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed.