World Athletics Championships – नीरज चोप्राने पहिल्याच ‘थ्रो’मध्ये उडवला धुरळा; रुबाबात गाठली अंतिम फेरी

टोकियो येथे सुरू असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटीक्स चॅम्पियनशिपमध्ये हिंदुस्थानचा सुवर्णपुत्र नीरज चोप्रा याने बहारदार खेळ करत एकाच ‘थ्रो’मध्ये 84.85 मीटर अंतरावर भाला फेकत थेट अंतिम फेरीचे तिकीट कन्फर्म केलं आहे. बुधवारी (13 सप्टेंबर 2025) पार पडलेल्या पात्रता फेरीत नीरज चोप्राने आपल्या पहिल्याच थ्रोमध्ये धुरळा करून टाकला. उद्या (18 सप्टेंबर 2025) अंतिम फेरीचा थरार रंगणार असून नीरज चोप्राची पाकिस्तानच्या अर्शद नदीमशी टक्कर होण्याची शक्यता आहे.

टोकियो येथे खेळल्या गेलेल्या पात्रता फेरीमध्ये नीरज चोप्राच्या ग्रुपमध्ये एकूण 6 खेळाडूंचा समावेश होता. या सहा जणांमध्ये नीरज चोप्रा एकमेक खेळाडू आहे, ज्याने पहिल्याच ‘थ्रो’मध्ये अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी 84.50 मीटरहून अधिक लांब भाला फेकायचा होता. नीरज चोप्राने पहिल्या थ्रोमध्ये 84.85 मीटर अंतरावर भाला फेकत सर्वांनाच सुख:द धक्का दिला. आता अंतिम फेरीचा थरार उद्या रंगणार आहे.

पात्रता फेरीमध्ये खेळाडूंची विभागणी दोन गटांमध्ये करण्यात आली होती. नीरज चोप्राचा समावेश ग्रुप ए मध्ये करण्यात आला होता. या ग्रुपमध्ये वेबर, वॉलकॉट, वॅडल्स आणि सचिन यादव यांचा समावेश होता. तर ग्रुप बी मध्ये अर्शद नदीम, पीटर्स येगो, दा सिल्वा, रोहित यादव, यशवीर सिंह आणि रमेश थरंगा पथिरगे यांचा समावेश होता. पात्रता फेरीत जे खेळाडू 84.50 मीटरहून अधिक अंतरावर भाला फेकतील, असे अव्वल 12 खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.

Comments are closed.