Sanitary Pads : वापरलेल्या सॅनिटरी पॅडची विल्हेवाट कशी लावायची?
मासिक पाळीत महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. या दिवसात महिलांना पोटदुखी, क्रॅम्प्स अशा समस्या जाणवतात. पूर्वी महिला रक्तस्त्रावामुळे कपडे खराब होऊ नयेत कापड वापरायच्या पण, त्यामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याने आता महिला सॅनिटरी पॅड, टॅम्पॉन्स वापरतात. पण, अनेकदा हे सॅनिटरी पॅड कचऱ्यात तसेच फेकण्यात येतात, जे योग्य नाहीत. अशाने केवळ पर्यावरणालाच नुकसान नाही तर सफाई कामगारांच्या आरोग्याला धोका असतो. अशा परिस्थितीत वापरलेल्या सॅनिटरी पॅडची विल्हेवाट कशी लावायची हे समजून घेऊयात,
अशी लावा विल्हेवाट –
- घरी किंवा कामाच्या ठिकाणी विल्हेवाट लावताना वापरलेले सॅनिटरी पॅड एका कागदात गुंडाळून डस्टबिनमध्ये टाका.
- पॅड फेकण्यासाठी प्लॅस्टिक बॅग वापरणे टाळावे, कारण यामुळे पॅडचे विघटन होत नाही.
- अनेका गावात महिला वापरलेले पॅड जाळून टाका, हा शेवटचा उपाय नाही. पण, उत्तम पर्याय आहे.
हेही वाचा – Women Health : तिशीनंतर महिलांनी अवश्य कराव्यात या हेल्थ टेस्ट
- पुनर्वापर करता येतील असे सॅनिटरी पॅड वापरावेत. जेणेकरून विल्हेवाट लावण्याचा प्रश्न येणार नाही.
- उत्तम दर्जाचे सॅनिटरी पॅड वापरावेत.
- सॅनिटरी पॅड उघड्यावर टाकू नयेत. रस्त्यावरील कुत्रे खाण्याचा प्रयत्न करतात.
- सॅनिटरी पॅड फ्लश करू नये.
- वापरलेले सॅनिटरी पॅड ओल्या कचऱ्यात टाकू नये.
एकच सॅनिटरी पॅड किती वेळ वापरायचा?
- सॅनिटरी पॅड दिवसाला किमान 3 वापरावेत.
- दर आठ ते सहा तासाने पॅड बदलणे गरजेचे असते. मग रक्तस्त्राव नसला तरी सुद्धा.
हेही वाचा – OCD म्हणजे फक्त स्वच्छता नीटनेटकेपणा? तज्ञांनी 5 गैरसमजुतीचा केला पर्दाफाश
Comments are closed.