Asia Cup: 3 जागांसाठी 5 संघांमध्ये जबरदस्त लढत, पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर! जाणून घ्या सविस्तर

आशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) आशिया कप 2025 स्पर्धेतील (Asia Cup 2025) लीग स्टेज आता संपण्याच्या मार्गावर आहे. लीग स्टेजचे फक्त 3 सामने बाकी आहेत. तरीदेखील आतापर्यंत फक्त 1 च संघ सुपर-4 साठी पात्र ठरला आहे. टीम इंडियाशिवाय (Team india) इतर सगळ्या मोठ्या संघांना अजूनही सुपर-4 च्या तिकिटाची वाट बघावी लागत आहे. दरम्यान, ओमान आणि हाँगकाँग संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. उरलेल्या 3 जागांसाठी आता 5 संघांमध्ये जोरदार लढत होणार आहे. या संघांनी अद्याप आपली आशा जिवंत ठेवली आहे.

आशिया कप 2025 स्पर्धेमध्ये आज पाकिस्तान आणि यूएई (PAK vs UAE) यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात जिंकणारा संघ थेट सुपर-4 मध्ये पोहोचेल, तर पराभूत झालेल्या संघाचा प्रवास इथेच थांबेल. श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना 18 सप्टेंबर रोजी होणार आहे. या सामन्यात जिंकणाऱ्या संघाला थेट सुपर-4 मध्ये प्रवेश मिळेल. मात्र पराभूत संघालाही अजून सुपर-4 मध्ये जाण्याची संधी आहे. जर हा सामना टोकाचा झाला, तर बांगलादेशच्या अडचणी आणखीनच वाढतील.

Comments are closed.