स्मृती मानधनाने तुफानी शतक ठोकत रचला इतिहास! पाहा वनडेत सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंची यादी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधनाने (Smriti Mandhna) आपल्या वनडे करिअरमधील 12वं शतक ठोकलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात तिने 117 धावांची दमदार खेळी केली. या कामगिरीमुळे महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासात मानधना सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.
मोहालीजवळील मुल्लांपूर येथे झालेल्या या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली. सलामीची फलंदाज प्रतिका रावल फक्त 25 धावा करून बाद झाली, पण दुसऱ्या बाजूला स्मृतीने डाव सांभाळत अप्रतिम खेळ दाखवला. तिने 91 चेंडूत 117 धावा केल्या. तिच्या या धडाकेबाज खेळीत 14 चौकार आणि 4 षटकार होते. विशेष म्हणजे 80 धावा तिने फक्त चौकार–षटकारांतूनच केल्या.
पहिल्या वनडे सामन्यातही स्मृतीने 58 धावांची खेळी केली होती. याशिवाय, ती वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. या यादीत पहिल्या स्थानी माजी कर्णधार मिताली राज (Mitali Raj) आहेत, ज्यांनी आपल्या करिअरमध्ये तब्बल 7805 धावा केल्या होत्या.
महिला वनडे करिअरमधील सर्वाधिक शतकं
मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया) – 15 शतके
सूजी बेट्स (न्यूझीलंड) – 13 शतकं
स्मृती मंदाना (भारत) – 12 वे शतक
टॅमी ब्यूमाँट (इंग्लंड) – 12 शतकं
हेली मॅथ्यूज (वेस्ट इंडिज) – 9 शतकं
भारतीय खेळाडूंमध्ये स्मृतीनंतर हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि मिताली राज यांच्या नावावर प्रत्येकी 7 शतकं आहेत. त्यांच्याशिवाय कोणत्याही भारतीय महिला खेळाडूने अजून वनडेमध्ये 5 शतकांचा टप्पा गाठलेला नाही.
Comments are closed.