मोठी बातमी : पाकिस्तानची आशिया चषकातून माघार, टीम इंडियाने हस्तांदोलन टाळल्यानंतर मोठा निर्णय
पाकिस्तानने आशिया कप 2025 पासून माघार घेतली: आशिया चषकात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंची हस्तांदोलन टाळल्यानंतर आता पाकिस्ताननेही टोकाचे पाऊल उचललं आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघाने थेट आशिया कपमधून अर्थात आशिया चषकातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने हस्तांदोलन टाळल्यानंतर मॅच रेफ्रीवर कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानी क्रिकेट संघाने केली आहे. याबाबतचं वृत्त पाकिस्तानातील जिओ न्यूजने दिलं आहे.
आशिया चषक 2025 मध्ये रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झाला होता. या सामन्यात भारताने मोठा विजय मिळवला होता. मात्र, पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामुळे भारतीय खेळाडूंनी सामना संपल्यानंतर हस्तांदोलन केलं नव्हतं. त्यामुळे पाकिस्तानने आशिया चषकातून माघार घेतली असल्याचं समोर आलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.