पाकिस्तान-यूएई सामना रद्द!पाकिस्तानचा आशिया कप 2025 वरती बहिष्कार
आशिया कप 2025 मध्ये आज पाकिस्तानची युएई विरुद्ध सामना होणार होता. मात्र, त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानने युएई विरुद्धच्या सामन्यातून आपली नावे मागे घेतली आहेत. पीसीबीने आपल्या खेळाडूंना मैदानात न जाऊन फक्त हॉटेलमध्ये राहण्याचे आदेश दिले आहेत. भारतविरुद्धच्या सामन्यानंतर ‘नो हँडशेक’ वाद मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला होता. त्यानंतर सामन्याचे रेफरी अँडी पाइक्रॉफ्ट यांना काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती, पण आयसीसीने नकार दिला. या कारणास्तव कदाचित पाकिस्तान आता आशिया कपचा बहिष्कार करत आहे.
आशिया कप 2025 (Asia Cup 2025) स्पर्धेतील सर्वात मोठा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघात 14 सप्टेंबर रोजी खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानला फक्त 127 धावा करता आल्या. पाकिस्तान संघासाठी सर्वाधिक 40 धावा साहिबजादा फरहानने केल्या.
सूर्यकुमार यादवने खऱ्या अर्थाने कर्णधार पद भूषवत संयम ठेवत 47 धावा केल्या. टीम इंडिया साठी प्रत्येक गोलंदाजाने म्हणजेच कुलदीप यादव, अक्षर पटेल, आणि जसप्रीत बुमराह यांनी दोन- दोन विकेट्स घेतल्या. तसेच वरुण चक्रवर्ती आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
सामना खेळून झाल्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि भारतीय संघ थेट ड्रेसिंग रुममध्ये गेले. भारतीय संघाने पाकिस्तान संघातील खेळाडूंसोबत हस्तांदोलन केले नाही. हेच हँडशेक प्रकरण पुढे जाऊन आणखी वाढले आहे.
Comments are closed.