आयसीसी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट रँकिंगमध्ये बुमराह नाही तर ‘हा’ गोलंदाज नंबर-1! जाणून घ्या संपूर्ण यादी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या सध्याच्या रँकिंगमध्ये वरुण चक्रवर्ती (Varun chakrawarthy) जगातील नंबर-1 गोलंदाज ठरला आहे. तो आधी चौथ्या स्थानावर होता, पण आता तो थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतीय संघ आधीपासूनच जगातील क्रमांक-1 टी20 संघ (India Team Ranking in T20) आहे. मात्र, जगातील आघाडीच्या गोलंदाजांपैकी एक असलेला जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) टी20 गोलंदाजांच्या टॉप-10 यादीत देखील नाही. जाणून घेऊया सध्या टी20 मध्ये टॉप-5 भारतीय गोलंदाज कोण आहेत.

टी20 गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये वरुण चक्रवर्ती आधी चौथ्या स्थानावर होता. पण आता त्याने थेट पहिलं स्थान पटकावलं आहे. त्याचे रेटिंग पॉइंट्स 733 आहेत. आशिया कप 2025 स्पर्धेमध्ये (Asia Cup) त्याने भारतासाठी दोन्ही सामने खेळले आहेत. यूएईविरुद्ध 2 षटकांत फक्त 4 धावा देत 1 विकेट घेतली होती. तर पाकिस्तानविरुद्ध 4 षटकांत 24 धावा देत 1 विकेट घेतली होती.

टी20 मधील टॉप-5 भारतीय गोलंदाज

वरुण चक्रवर्ती

रवी बिश्नोई

अक्षर पटेल

अरशदीप सिंग

कुलदीप यादव

कुलदीप यादवला (Kuldeep yadav) आशिया कपमध्ये शानदार कामगिरीमुळे रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे. त्याने 2 सामन्यांत 7 विकेट घेतल्या असून, सध्या भारताकडून या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा तो खेळाडू ठरला आहे.

Comments are closed.