नीरज प्राथमिक फेरीत सहाव्या स्थानावर, जेतेपद राखण्यासाठी सर्वोत्तम भालाफेकीचे आव्हान

जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष भालाफेक प्रकाराच्या अंतिम फेरीत पुन्हा एकदा नीरज चोप्राला आपल्या सर्वोत्तम भालाफेकीची पुनरावृत्ती करावी लागणार आहे. बुधवारी झालेल्या प्राथमिक फेरीत गतविजेता नीरज 84.85 मीटर भालाफेक करत सहाव्या स्थानावर येत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. ग्रेनाडाच्या ऍण्डरसन पीटर्सने 89.53 इतकी जबरदस्त भालाफेक करत अव्वल स्थान पटकावले. गुरुवारी होणाऱ्या अंतिम लढतीत चोप्रासमोर पीटर्ससह ज्युलियन वेबर, डेव्हिड वॅगनार आणि अर्शद नदीम यांचे आव्हान असेल.
पीटर्स आणि वेबरचे मजबूत प्रदर्शन
ग्रेनाडाचा माजी जगज्जेता ऍण्डरसन पीटर्सने 89.53 मीटरची हंगामातील सर्वोत्तम भालाफेक करत स्पर्धेत अव्वल स्थान मिळवले. जर्मनीचा ज्युलियन वेबरने 87.21 मीटरची फेकी करीत दुसऱ्या स्थानी राहिला, तर केनियाचा ज्युलियस येगो आणि झेक प्रजासत्ताकचा याकूब वाडलेच यांनीही अंतिम फेरी गाठली.
गेल्या वर्षी बुडापेस्ट येथे झालेल्या मागील जागतिक स्पर्धेत नीरज चोप्राने 88.17 मीटरची फेकी करत सुवर्णपदक जिंकले होते. अर्शद नदीम 87.82 मीटरसह दुसऱ्या, तर वाडलेच 86.67 मीटरसह तिसऱ्या स्थानी राहिला होता. मात्र, पॅरिस
ऑलिम्पिकमध्ये नदीमने विक्रमी 92.97 मीटरची फेकी करून सुवर्णपदक पटकावले आणि ऑलिम्पिक विक्रम मोडला. त्यावेळी नीरजला 89.45 मीटरसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्याचे पाच प्रयत्न फाऊल ठरले होते.
भालाफेक पात्रता फेरीतील अव्वल 12 खेळाडू
- अँडारसन पीटर्स (ग्रॅनाडा) 89.53 मी.
- ज्युलियन वेबर (जर्मनी) 87.21 मी.
- ज्युलियस येगो (केनिया) 85.96 मी.
- डेव्हिड वेग्नर (पोलंड) 85.67 मी.
- अर्शद नदीम (पाकिस्तान) 85.28 मी.
- नीरज चोप्रा (हिंदुस्थान) 84.85 मी.
- कर्टिस थॉम्पसन (अमेरिका) 84.72 मी.
- याकुबाची वाढ (झेक रिपब्लिक) 84.11 मी.
- केशॉर्न वॉलकॉट (त्रिनिदाद -टोबॅगो) 83.93 मी.
- सचिन यादव (हिंदुस्थान) 83.67 मी.
- कॅमेरून मॅकइनटायर (ऑस्ट्रेलिया) 83.03 मी.
- रुमेश थारंगा पथिरागे (श्रीलंका) 82.80 मी.
नीरज सुलभ वर्ण, तर अर्शदचा संघर्ष
जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ‘अ’ गटाच्या पात्रता फेरीत नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 84.50 मीटर भालाफेक करत 84 मीटरची पात्रता मर्यादा पार केली आणि अंतिम फेरीत प्रवेश मिळवला, मात्र पाकिस्तानच्या अर्शद नदीमची सुरुवात निराशाजनक झाली. शेवटच्या प्रयत्नात त्याने 85.28 मीटरची भालाफेक करत अंतिम फेरीत नाटय़मय पुनरागमन केले. हिंदुस्थानचा सचिन यादवनेही 83.67 मीटरची सर्वोत्तम फेक करीत
टॉप-12 मध्ये स्थान मिळवले आणि अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला.
Comments are closed.