राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रावर आशीष शेलार यांची टीका, जय शहा यांनी योग्य केले!

पहलगाम हल्ल्याची जखम भळभळत असताना पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास हिरवा कंदील दाखवणाऱ्या मोदी सरकारला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून फटकारले. गृहमंत्री अमित शहा आणि आयसीसीचे चेअरमन जय शहा यांच्यावर राज यांचा कुंचला चालला. हे व्यंगचित्र भाजपला खटकले असून मंत्री अॅड. आशीष शेलार यांनी त्यावर टीका करत जय शहा कसे योग्य आहेत, हे सांगितले.
‘अरे बाबांनो उठा, आपण जिंकलो, पाकिस्तान हरले’ असे गृहमंत्री आणि आयसीसी हे पहलगाम हल्ल्यात बळी गेलेत त्यांना सांगत असल्याचे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी रेखाटले आहे. ‘नक्की कोण जिंकलं आणि कोण हरलं’, असा सवाल राज यांनी विचारला आहे. त्यावर पत्रकारांनी विचारले असता, कलेमध्ये राजकारण असेल तर त्याला राजकीय उत्तर द्यावं लागेल, असे शेलार म्हणाले. जय शहा नावाची भीती सर्वांना वाटते आहे का? त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटमध्ये भारताचं नाव उंचावले. देशहिताचे काम केले. त्यामुळे त्यांच्यावर असं व्यंग करणं अयोग्य आहे, असे शेलार म्हणाले.
Comments are closed.