Viral Video: लाखो रुपयांचा iPhone मिळतोय 200 रुपयांत, व्हिडिओ पाहून धक्काच बसेल
आयफोन 17 चा क्रेझ सध्या प्रचंड आहे. नवीन आयफोन बाजारात येताच लोकं रिव्ह्यू पाहतायत, काही जण कर्ज काढून खरेदीचे प्लॅन आखतायत तर काहीजण दुसरा पर्याय शोधत आहेत. पण सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे की, पाहून खरंच डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. कारण लाखो रुपयांचा आयफोन नाही, तर हुबेहुब आयफोनसारखं दिसणारं एक प्रॉडक्ट केवळ 200 रुपयांत विकलं जातंय. (fake iphone makeup kit viral video)
मेकअप किटच्या रूपात ‘आयफोन’
shortie__shorts या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक आयफोन दिसतो, पण प्रत्यक्षात तो मोबाईल नसून मेकअप किट आहे. महिलांसाठी वापरलं जाणारं फाउंडेशन, कलर पॅलेट्स ठेवण्यासाठी हा खास बॉक्स तयार केला आहे. हुबेहुब आयफोन 17 सारखं डिझाईन असल्याने दूरून पाहणाऱ्यांना खरोखरच आयफोनच वाटतो.
या व्हिडिओने सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत तो 39 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेकांनी या क्रिएटिव्ह आयडियाचं कौतुक केलं आहे. काहींनी तर मजेशीर प्रतिक्रिया देत “अखेर आयफोनच्या किंमती कमी झाल्या” किंवा “अॅपलचे CEO रात्री दोन वाजेपर्यंत दारू पितील” अशा कमेंट्स लिहिल्या आहेत.
फोन विक्रेते आता आयफोन 12 आयफोन 17 प्रो मॅक्समध्ये रूपांतरित करीत आहेत. pic.twitter.com/xec7oo4vtc
– 𝐀𝐬𝐚𝐤𝐲𝐆𝐑𝐍 (@asakygrn) 15 सप्टेंबर, 2025
प्रेक्षकांचा उत्साह
हा व्हिडिओ पाहून अनेक तरुणाईनं प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना ही कल्पना भन्नाट वाटली तर काहींनी थेट आयफोनच्या महागाईवर टोलाही लगावला. सोशल मीडियावर या व्हिडिओवर अजूनही भन्नाट कमेंट्सचा पाऊस पडतो आहे.
आयफोनसारख्या प्रॉडक्टचा वापर करून केलेलं हे क्रिएटिव्ह मार्केटिंग लोकांना प्रचंड आवडलं आहे. खरं तर हा मोबाईल नसला तरी व्हिडिओ पाहताना लोकांना चक्क तो महागडा फोनच वाटतो. त्यामुळे सोशल मीडियावर या भन्नाट आयडियाने चांगलीच चर्चा रंगवली आहे.
Comments are closed.