शेअर्स गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक हा फौजदारी गुन्हाच, हायकोर्टाने फेटाळला आरोपींचा अटकपूर्ण जामीन

शेअर्स गुंतवणुकीचे आमिष दाखवून झालेली फसवणूक हे दिवाणी प्रकरण नसून फौजदारी गुन्हाच आहे, असे नमूद करत उच्च न्यायालयाने दोन आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला. रुपाली जाधव, बापूराव जाधव, अशी या आरोपींची नावे आहेत. खारघर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात होणारी अटक टाळण्यासाठी या दोघांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते.
न्या. अमित बोरकर यांच्या एकल पीठासमोर यावर सुनावणी झाली. हे प्रकरण दिवाणी आहे, असा दावा करत या दोघांनी अटकेपासून संरक्षण मागितले होते. ही फौजदारी फसवणूक असल्याचे नमूद करत न्यायालयाने या दोघांच्या याचिका फेटाळून लावल्या.
सांगून पैसे नाही देणे फसवणूकच
पैसे देण्याचे सांगून ते देणे ही फसवणूकच आहे. शेअर्समध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. याचा तपास होणे आवश्यक आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
Comments are closed.