1 सामना 3 संघांचे भवितव्य ठरवणार; पाकिस्तानच्या विजयानंतर आशिया चषकातील सुपर-4 चं समीकरण काय?
एशिया कप 2025 सुपर -4 परिस्थितीः आशिया चषक 2025 स्पर्धेत ग्रुप-अ मधून भारत (Team India) आणि पाकिस्तान (Pakistna) सुपर-4 मध्ये दाखल झाले आहेत. तर ग्रुप-ब मधून अद्याप कोणताही संघ सुपर-4 साठी निश्चित झालेला नाही. आज अफगाणिस्तान आणि श्रीलंका (AFG vs SL) यांच्या साखळी सामना खेळवण्यात येईल. या सामन्यानंतर ग्रुप-ब मधील सुपर-4 चं समीकरण स्पष्ट होईल. त्यामुळे एका अफगाणिस्तान आणि श्रीलंकेच्या सामन्यावर त्यांच्यासह तीन संघांचे (अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश) भवितव्य ठरणार आहे.
ग्रुप-अ चे समीकरण-
भारत आणि पाकिस्तानने गट अ मध्ये त्यांचे सुपर-4 स्थान निश्चित केले आहे. दोन सामन्यांपैकी दोन विजयानंतर भारताचे 4 गुण आहेत, तर पाकिस्तानने तीन सामने खेळले आहेत आणि दोन विजयांसह त्यांचे 4 गुण आहेत. तथापि, नेट रनरेटच्या आधारे, भारत (+4.793) पाकिस्तानपेक्षा (+1.790) पुढे आहे. तर भारताचा आणखी एक साखळी सामना शिल्लक आहे. 19 सप्टेंबर रोजी भारत आणि ओमान यांच्यात सामना रंगणार आहे.
ग्रुप-ब चे समीकरण-
श्रीलंकेने दोन साखळी सामने खेळले असून दोन्ही सामन्यात श्रीलंकने विजय मिळवला आहे. श्रीलंकेच सध्या 4 गुण आहेत. तर बांगलादेशने 3 सामने खेळले असून यामध्ये दोन सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे बांगलादेशचेही 4 गुण आहेत. अफगाणिस्तानने दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकला आणि एक सामना गमावला. सध्या अफगाणिस्तानचे 2 गुण असून तिसऱ्या स्थानावर कायम आहेत. आज अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात शेवटचा साखळी सामना रंगणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल, तो संघ सुपर-4 मध्ये क्वालिफाय होईल.
आशिया कप 2025 मध्ये सुपर फोरमध्ये पोहोचणारे संघ (दिनांक 17 सप्टेंबरपर्यंत)
1. भारत
2. पाकिस्तान
आशिया कप 2025 मधून बाहेर पडलेले संघ (दिनांक 17 सप्टेंबरपर्यंत)
1. ओमान
26.
3. हाँगकाँग
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामना कधी आणि कुठे पाहायचा?
श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील गट फेरीचा सामना 18 सप्टेंबर रोजी अबू धाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल. सोनी लिव्ह अॅप आणि वेबसाइटवर थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल. याशिवाय, फॅनकोड अॅपवर देखील थेट प्रक्षेपण केले जाईल.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.