बुमराहला 6 सिक्स मारण्याचं स्वप्न घेऊन आला, सलग 3 डावात शून्यावर बाद झाला; पाकच्या फलंदाजाची ना
एशिया कप 2025 आयब म्हणतो: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेवर (Asia Cup 2025) बहिष्कार टाकण्याची धमकी मागे घेतल्यानंतर पाकिस्तानने 17 सप्टेंबर रोजी अखेरच्या साखळी सामन्यात कडवी झुंज दिलेल्या यूएईचा 41 धावांनी (Pak vs UAE) पराभव केला. याविजयासह पाकिस्तानने सुपर फोर फेरीत प्रवेश निश्चित केला. त्यामुळे 21 सप्टेंबर रोजी आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) आमनेसामने येणार आहेत. दरम्यान, सध्या पाकिस्तानचा सलामीवीर सईम अयुबची (Saim Ayub) चर्चा रंगलीय.
पाकिस्तानचा सलामीवीर सईम अयुब आशिया चषकातील तीनही साखळी सामन्यात अपयशी ठरला. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या माजी खेळाडूंनी आशिया चषक सुरु होण्याआधी सईम अयुबचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. तसेच भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला षटकार मारण्याची स्वप्न पाहणारा सईम अयुब सलग तीन सामन्यात शून्यावर बाद झाल्याने त्याची नाचक्की झाली आहे. सलग तीन सामन्यात खातंही उघडता न आल्याने सईम अयुबला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.
सईम अयुबची आशिया चषकामधील आतापर्यंतची कामगिरी-
ओमान -0 (1) पाकिस्तान विरुद्ध
पाकिस्तान विरुद्ध भारत- 0 (1)
युएई- 0 (1) पाकिस्तान विरुद्ध
ग्रुप-अ चे समीकरण-
भारत आणि पाकिस्तानने गट अ मध्ये त्यांचे सुपर-4 स्थान निश्चित केले आहे. दोन सामन्यांपैकी दोन विजयानंतर भारताचे 4 गुण आहेत, तर पाकिस्तानने तीन सामने खेळले आहेत आणि दोन विजयांसह त्यांचे 4 गुण आहेत. तथापि, नेट रनरेटच्या आधारे, भारत (+4.793) पाकिस्तानपेक्षा (+1.790) पुढे आहे. तर भारताचा आणखी एक साखळी सामना शिल्लक आहे. 19 सप्टेंबर रोजी भारत आणि ओमान यांच्यात सामना रंगणार आहे.
ग्रुप-ब चे समीकरण-
श्रीलंकेने दोन साखळी सामने खेळले असून दोन्ही सामन्यात श्रीलंकने विजय मिळवला आहे. श्रीलंकेच सध्या 4 गुण आहेत. तर बांगलादेशने 3 सामने खेळले असून यामध्ये दोन सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे बांगलादेशचेही 4 गुण आहेत. अफगाणिस्तानने दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकला आणि एक सामना गमावला. सध्या अफगाणिस्तानचे 2 गुण असून तिसऱ्या स्थानावर कायम आहेत. आज अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात शेवटचा साखळी सामना रंगणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल, तो संघ सुपर-4 मध्ये क्वालिफाय होईल.
आशिया कप 2025 मध्ये सुपर फोरमध्ये पोहोचणारे संघ (दिनांक 17 सप्टेंबरपर्यंत)
1. भारत
2. पाकिस्तान
आशिया कप 2025 मधून बाहेर पडलेले संघ (दिनांक 17 सप्टेंबरपर्यंत)
1. ओमान
26.
3. हाँगकाँग
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.