ब्रेकअप झालंय? या टिप्सने स्वत:ला सावरा

जेव्हा आपण एखाद्याच्या प्रेमात पडतो तेव्हा संपूर्ण जग सुंदर दिसू लागते. पण, नातं म्हटलं की, नात्यात प्रेम, भांडण आणि दुरावा हा आलाच. पण, कधी कधी लहानशा वादामुळे नात्यावर परिणाम होऊन त्याचा अंतही होऊ शकतो. ज्याला आजची पिढी ब्रेकअप असे म्हणते. या ब्रेकअपनंतर एकमेकांशिवाय जगणं बऱ्याचदा कठीण जातं. प्रिय असणारी व्यक्ती जेव्हा दूर जाते, तेव्हा त्याच्यासोबत घालवलेले क्षण विसरणे कठीण होते. जर तुम्ही सुद्धा ब्रेकअप झाल्यानंतर एक्सच्या आठवणींमध्ये बुडाले असाल तर पुढील गोष्टी करून पाहा. ज्यामुळे तुम्ही एकदा स्वत:ला सावरुन आनंदी आयुष्य जगू शकता.

अनेकदा ब्रेकअपनंतर काही जणांना असे वाटते की आपला प्रियकर किंवा प्रेयसीशिवाय आपण जगूच शकत नाही. पण, कोणत्याही नात्यात चांगले वाईट दिवस पाहिल्याशिवाय ते नातं दीर्घकाळ टिकत नाही, पूर्ण होत नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवे.

स्वत:ला वेळ द्या –

ब्रेकअपनंतर स्वत:ला वेळ द्यावा. तुम्ही जास्तीत जास्त बिझी कसे राहाल याकडे लक्ष द्यावे. कारण जितके तुम्ही कामात व्यग्र राहाल तेवढे लवकर मूव्ह ऑन राहण्यास मदत होईल.

हे ही वाचा – बोलायला कोणी नाही म्हणून टीनएजर बोलत सुटलेत एआयशी

फ्रेन्ड्स किंवा कुटूंबासोबत वेळ घालवा –

मूव्ह ऑन होण्यासाठी फ्रेन्ड्स किंवा कुटूंबासोबत वेळ घालवावा. यामुळे एक्सची आठवण येणार नाही. ब्रेकअपमधून बाहेर येण्यासाठी फ्रेन्ड्स अधिक मदत करून शकतील.

एक्ससोबतचे सर्व कॉन्टॅक्ट तोडा –

एक्ससोबत असलेले सर्व कॉन्टॅक्ट तोडा. जसे की, अजूनही फेसबूक फ्रेन्ड्स, इन्स्टाला फॉलो करत असाल तर ब्लॉक करा. सर्व चॅट्स डिलीट करावी. यामुळे तुम्हाला घालवलेले क्षण विसरण्यास मदत मिळेल.

भविष्याचा स्वीकार करा –

ब्रेकअपनंतर भविष्याचा सकारात्मकतेने स्वीकार करावा. नवीन योजना आखा आणि स्वत:ला अधिक महत्त्व द्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ब्रेकअप म्हणजे जीवनाचा शेवट नाही.

हे ही वाचा – झुग थेरपी: जाडू की फिप्पी ते बांती हा! आपली मॅरेल मिथी

Comments are closed.