आशिया कप 2025: सुपर-4 फेरीतील संघ ठरले, पाहा पुढील वेळापत्रक एका क्लिकवर
Asia Cup 2025 Super 4 : आशिया कपमधील सर्व सामने शानदार पद्धतीने खेळला जात आहेत, श्रीलंकेने अफगाणिस्तानचा 6 विकेट्सनी पराभव करून सुपर-4 मध्ये प्रवेश केला आहे. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 169 धावा केल्या. त्यानंतर कुसल मेंडिसच्या दमदार अर्धशतकामुळे श्रीलंकेने लक्ष्य सहज गाठले. श्रीलंकेने त्यांचे तीनही गट सामने जिंकले आहेत.
श्रीलंकेसाठी कुसल मेंडिसने दमदार खेळ केला. त्याने 52 चेंडूत 10 चौकारांसह 74 धावा केल्या. कुसल परेरानेही 28 धावांचे योगदान दिले. शेवटी, कामिंदू मेंडिसने 13 चेंडूत 26 धावा केल्या आणि श्रीलंकेने लक्ष्याचा सहज पाठलाग केला.
ग्रुप ए मधून भारत आणि पाकिस्तान सुपर-4 साठी पात्र ठरले आहेत. दरम्यान, ग्रुप बी मधून श्रीलंका आणि बांगलादेश सुपर 4 साठी पात्र ठरले आहेत. सुपर 4 चे सामने 20 सप्टेंबर रोजी सुरू होतील. सुपर 4 पॉइंट टेबलमध्ये टॉप दोनमध्ये स्थान मिळवणारे संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.
भारतीय क्रिकेट संघ सुपर 4 फेरीतील आपला पहिला सामना 21 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळेल. त्यानंतर, टीम इंडिया 24 सप्टेंबर रोजी आपल्या शेजारी असलेल्या बांगलादेशशी खेळेल. भारतीय क्रिकेट संघ सुपर 4 मध्ये आपला शेवटचा सामना 26 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळेल.
सुपर 4 चे संपूर्ण वेळापत्रक:
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका, 20 सप्टेंबर
भारत विरुद्ध पाकिस्तान, 21 सप्टेंबर
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, 23 सप्टेंबर
बांगलादेश विरुद्ध भारत, 24 सप्टेंबर
बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान, 25 सप्टेंबर
भारत विरुद्ध श्रीलंका, 26 सप्टेंबर
Comments are closed.