Asia Cup 2025 : श्रीलंकेने अफगाणिस्तानला हरवून सुपर-4 मध्ये केला प्रवेश; रशीद खानचा संघ बाहेर

आशिया कप 2025 च्या 11 व्या सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला. यामुळे ग्रुप बी मधून श्रीलंका आणि बांगलादेशचे सुपर फोरमध्ये स्थान निश्चित झाले. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने श्रीलंकेसमोर 170 धावांचे लक्ष्य ठेवले. श्रीलंकेने हे लक्ष्य 18.4 षटकांत 4 विकेट्स गमावून पूर्ण केले. या पराभवामुळे आशिया कप 2025 मधील अफगाणिस्तानच्या मोहिमेचा शेवट झाला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अफगाणिस्तानची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर रहमानउल्लाह गुरबाजला नुवान तुषारने 14धावांवर बाद केले. त्यानंतर नुवान तुषारने फक्त एक धाव करू शकलेल्या करीम जनतला बाद केले. त्यानंतर तुषारने 14 चेंडूत 18 धावा काढणाऱ्या सेदिकुल्लाह अटलला बाद केले. एकेकाळी अफगाणिस्तानने 137 धावांवर सात विकेट गमावल्या होत्या आणि ते 150 धावांपर्यंतही पोहोचू शकत नव्हते. मात्र, डावाच्या शेवटच्या षटकात मोहम्मद नबीने पाच चेंडूत पाच षटकार मारून संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. नबीने 20 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि 22 चेंडूत 60 धावा काढून बाद झाला. श्रीलंकेचा नुवान तुषारा हा सर्वात यशस्वी गोलंदाज होता, त्याने चार विकेट घेतल्या.

170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर पथुम निस्सांका 5 चेंडूत 6 धावा काढून बाद झाला. त्यानंतर, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा कामिल मिशारा 10 चेंडूत फक्त 4 धावा काढून बाद झाला. त्यानंतर, कुसल परेरा 28 धावा करून आणि कर्णधार चारिथ असलंका 17 धावा करून बाद झाला. संघ सतत विकेट गमावत असताना, दुसऱ्या टोकाला फलंदाजी करणारा कुसल मेंडिस चांगली फलंदाजी करत राहिला. कामिंदू मेंडिस (नाबाद 26) ने शेवटी त्याला साथ दिली. कुसल मेंडिसने 52 चेंडूत 74 धावा करत नाबाद राहिला. अखेर श्रीलंकेने हे लक्ष्य सहज गाठले. या सामन्यात अफगाणिस्तानकडून मुजीब, उमरझाई, नबी आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

Comments are closed.