ड्रग्ज तस्कर देशांच्या यादीत हिंदुस्थानचे नाव टाकले, मोदी यांना ट्रम्प यांचे बर्थडे गिफ्ट
‘माय फ्रेंड डोलांड ट्रम्प’ अशी स्तुतीसुमने उधळणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढदिवशी भेट दिली. ट्रम्प यांनी चीन, अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशांसह 23 देशांना ड्रग्ज उत्पादक आणि ड्रग्ज तस्करीचे अड्डे आहे, असे सांगितले असून हिंदुस्थानला ड्रग्ज तस्करी करणाऱ्या स्मगलर देशांच्या यादीत टाकले आहे. ट्रम्प यांनी ऐन मोदींच्या वाढदिवशी हा निर्णय घेतल्याने ही पंतप्रधान मोदींना ट्रम्प यांच्याकडून भेट आहे, असे बोलले जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन काँग्रेसला अध्यक्षीय निर्धार (प्रेसिडेन्शियल डिटरमिनेशन) सादर केला आहे. यामध्ये अमेरिकेत येत असलेली बेकायदेशीर ड्रग्ज अशा 23 देशांची यादी तयार केली जात आहे. यात हिंदुस्थानचा समावेश असून या सर्व 23 देशांमध्ये ड्रग्ज निर्मिती आणि तस्करी संदर्भात सुरू असलेल्या कृत्यामुळे अमेरिकेच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे, असेही यावेळी म्हटले आहे. ट्रम्प यांनी हा प्रेसिडेन्शियल डिटरमिनेशन अमेरिकेच्या संसद सभागृहात सादर केले आहे. अमेरिकेत येत असलेल्या ड्रग्जची निर्मिती आणि त्याची तस्करी यासंबंधी महत्त्वाची यादी ट्रम्प यांनी सभागृहात दिली आहे. त्या देशातील व्यावसायिक, भौगोलिक आणि आर्थिक घटकांकडून ड्रग्ज निर्मिती आणि तस्करीला मदत केली जात आहे, असे अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने म्हटले आहे.
यादीत कोणते देश!
हिंदुस्थान, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बहामास, अॅनॅक्यू
Comments are closed.