Iphone 17 सीरिजला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद, Apple Store बाहेर मध्यरात्रीपासून रांग

अॅपलने ( 9 सप्टेंबर) ला आयफोन 17 सीरिज लाँच केली. त्यानंतर बाजारामध्ये हा फोन कधी येणार याची उत्सुकता अॅपलप्रेमींना लागली होती. (19 सप्टेंबर) IPhone17 चा सेल सुरु झाला. ही सिरीज लॉन्च झाल्यापासूनच चाहत्यांना या फोनची प्रचंड उत्सुकता लागलेली होती. त्यामुळे ग्राहकांनी रात्रीपासून मुंबईतील Apple Store बाहेर तोबा गर्दी करण्यास सुरुवात केली. हजारोंच्या संख्येने तरुणाई हा फोन विकत घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आयफोन 17 सीरिजच्या प्री ऑर्डरला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एएनआयने यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. मुंबईतील बीकेसी येथे असलेल्या अॅपल स्टोर बाहेर अॅपलाचा चाहता वर्ग पाहायला मिळत आहे. अनेकांनी या मोबाईलचे प्रीबुकिंग करून ठेवले होते. यामध्ये सर्वाधिक बुकिंग झालेला मोबाईल म्हणजे आयफोन 17 प्रो मॅक्स, जो कॉस्मिक ऑरेंज कलरमध्ये उपलब्ध आहे. या फोनला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
#वॉच | मुंबई | अमन चौहान, एक ग्राहक म्हणतो, “मी आयफोन 17प्रो मॅक्स विकत घेतला आहे, एक 256 जीबी आहे आणि दुसरा 1 टीबी आहे. मी 12 मध्यरात्रीपासून लाइनमध्ये थांबलो होतो आणि आता मला ते मिळाले आहे. त्यात नवीन वैशिष्ट्ये आहेत. केशरी रंग नवीन आहे…” https://t.co/nnwexymykn pic.twitter.com/ls3ns7rhxi
– वर्षे (@अनी) 19 सप्टेंबर, 2025
अशातच अमन चौहान नावाच्या एका तरूणाने देखील आयफोन 17 सीरिजमधील हेच 2 मोबाईलफोन विकत घेतले आहेत. दोन्ही फोन कॉस्मिक ऑरेंज कलरमध्ये असून त्यापैकी एक iPhone 17PRO Max (256GB) तर दुसरा (1TB) असल्याचे अमन चौहान याने सांगितले आहे. IPhone 17 साठी अमन गुरूवारी रात्री 12 वाजल्यापासून रांगेत उभा होता. या मोबाईलमध्ये 6.9 इंचांचा डिस्प्ले, 120 एचझेड रिफ्रेश रेट, आयओएस 26, ए19 प्रो प्रोसेसर, 48 प्लस 48 प्लस 48 प्लस मेगापिक्सलचा कॅमेरा (8xझूम), 18 मेगापिक्सलचा सेंटर स्टेज फ्रंट कॅमेरा असल्यामुळे या फोनला जास्त डिमांड मिळत आहे, असे त्यांने सांगितले.
Comments are closed.