पोर्तुगालमधील 14 हजार हिंदुस्थानींवर टांगती तलवार

विदेशात राहून पैसे कमावणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांना मोठा झटका बसला आहे. अमेरिकेकडून हजारो हिंदुस्थानी नागरिकांना देश सोडण्यास भाग पाडल्यानंतर आता पोर्तुगाल सरकारनेही अमेरिकेच्या पावलावर पाऊल टाकले आहे. पोर्तुगाल सरकारने बाहेरच्या देशातील नागरिकांना देशाबाहेर काढण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत 4 लाखांहून अधिक नागरिकांना पोर्तुगालबाहेर काढले जाणार आहे. यामध्ये हिंदुस्थानातील 14 हजार कामगारांचा यात समावेश आहे. यामध्ये सर्वात जास्त पंजाबमधील तरुणांचा समावेश आहे. पोर्तुगाल सरकारला टॅक्स देत असूनही सरकार आम्हाला देशाबाहेर काढत आहे हे चुकीचे आहे, असे या कामगारांचे म्हणणे आहे. दुसऱया देशांतून आलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पोर्तुगाल पोलीस नागरिकांना अटक करून जेलमध्ये टाकत आहेत.
Comments are closed.