Fashion Tips: ब्लाऊज सोडा, आता साडीसोबत क्रॉप टॉप स्टाईल करण्याचा ट्रेंड

साडीचा विषय आला की ब्लाऊजचे डिझाईन, पॅटर्न याबाबत गोंधळ उडतो. कोणत्या साडीवर कोणत्या पॅटर्नचा ब्लाऊज शोभून दिसेल असा विचार आपण करतो. पण आता साडी नेसायची असेल तेव्हा दर वेळी ब्लाऊजची गरज नाही. कारण आजकाल साडीसोबत क्रॉप टॉप स्टाईल करण्याचा नवीन फॅशन ट्रेंड सुरू झाला आहे. एरव्ही जीन्सवर स्टाईल केला जाणारा क्रॉप टॉप आता तुम्ही साडीवर देखील घालू शकता यामुळे तुम्हाला वेगळा लूक मिळेल.

फुल स्लीव्ह क्रॉप टॉप
फुल स्लीव्ह क्रॉप टॉप तुम्ही साडीसोबत घालू शकता. या क्रॉप टॉपमध्ये तुम्हाला विविध प्रकारचे प्रिंट आणि रंग मिळतील. तुम्ही हे क्रॉप टॉप ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणी खरेदी करू शकता.

पफ स्लीव्हज क्रॉप टॉप
आजकाल पफ स्लीव्हज ब्लाऊजची फॅशन आहे. पण त्याऐवजी तुम्ही साडीवर पफ स्लीव्हज क्रॉप टॉप ट्राय करा. यामुळे तुम्हाला रॉयल लूक मिळेल.

WH सारख्या स्तरित क्रॉप टॉप
व्ही-नेक लेयर्ड क्रॉप टॉप हा साडी किंवा लॉंग स्कर्ट दोन्हीवर कॅरी करता येतो. तुम्ही हा टॉप ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणी खरेदी करू शकता. डिझायनरमी, प्रिंट साड्यांवर हा टॉप शोभून दिसतो.

बलून स्लीव्हज क्रॉप टॉप
तुम्हाला एक अनोखा लूक हवा असेल तर साडीवर बलून स्लीव्हज क्रॉप टॉप घालू शकता. तुम्हाला हव्या असतील त्याप्रकारचा टॉप तुम्ही बनवून घेऊ शकता किंवा ऑनलाईन देखील घेऊ शकता.

Comments are closed.