मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा धमकीचा मेल; पोलिसांकडून झाडाझडती, तपास यंत्रणा अलर्ट

मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा धमकीचा मेल आल्याने खळबळ उडाली आहे. उच्च न्यायालयात बॉम्बस्फोट होऊ शकतो असा दावा मेलवरून करण्यात आला. यामुळे तपास यंत्रणा अलर्ट झाली आणि पोलिसांनी उच्च न्यायालयात धाव घेत झाडाझडती सुरू केली. पोलीस, बॉम्ब शोधक पथकाने न्यायालय आणि परिसरात शोधमोहीम हाती घेतली. मात्र तपासणी दरम्यान संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळे ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे न्यायालयीन कामकाजाला सुरुवात झाली.
बॉम्बे उच्च न्यायालयात बॉम्बचा धोका आहे. मुंबई पोलिसांनी हायकोर्टाच्या जागेचा शोध घेतला आणि त्यांना काहीही संशयास्पद वाटले नाही. हायकोर्टाला बॉम्बचा धोका मिळण्याची ही दुसरी वेळ आहे. अलीकडेच एक समान धोका प्राप्त झाला; संपूर्ण उच्च न्यायालय बाहेर काढले गेले, पण…
– वर्षे (@अनी) 19 सप्टेंबर, 2025
Comments are closed.