देवेंद्र फडणवीस हे ‘चोमु’, हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य

देवेंद्र फडणवीस हे चोमु (चोर मुख्यमंत्री) आहेत. मतचोरी करून मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.

मतचोरीवर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरी झाल्याचे पुरावे दिले आहेत, मुख्यमंत्री फडणवीसांकडे गृहमंत्रालयही आहे, त्यांच्या पोलिसांनी राजुरा विधान सभेतील मतचोरी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे तरिही देवेंद्र फडणवीस हे निवडणूक आयोगाची दलाली करत आहेत, त्यांनी ही दलाली बंद करावी. देवेंद्र फडणवीस हे चोर मुख्यमंत्री आहेत.”

Comments are closed.