IND vs OMAN: शुबमन गिलच्या दांड्या गुल! ओमानविरुद्ध केवळ 5 धावांवर बाद
IND vs OMAN: भारतीय संघ आज (19 सप्टेंबर) शेख झायेद स्टेडियमवर ओमानविरुद्ध आशिया कप 2025 चा शेवटचा लीग सामना खेळत आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्लेइंग इलेव्हन भारताने दोन बदल केले आहेत. जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांच्या जागी हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांना संघात स्थान देण्यात आले.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला दुसऱ्या षटकातच शुभमन गिलच्या रूपात पहिला धक्का बसला. गिल 8 चेंडूत 5 धावा करुन क्लिन बोल्ड झाला. त्याला शाह फैसलने बाद केलं. भारताने पहिल्या पाॅवरप्ले पर्यंत 6 षटकात 60/1 धावा केल्या आहेत.
सध्या संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा क्रीजवर उपस्थित आहेत. या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांच्या जागी हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांना संधी मिळाली आहे.
टीम इंडियाने सुपर-4 साठी आधीच पात्र झाली आहे. भारत 21 सप्टेंबर रोजी पाकिस्तानशी भिडेल.
भारताचे सुपर-4 फेरीतील सामने
विरुद्ध पाकिस्तान (21 सप्टेंबर)
विरुद्ध बांग्लादेश (24 सप्टेंबर)
विरुद्ध श्रीलंका (26 सप्टेंबर)
दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-
भारत: अभिषेक शर्मा, शुबमन गिल, संजू सॅमसन (यशक्रकसन), सूर्यकुमार यादव (कर्नाधर), टिळ वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अकसर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुल्दीप यादव
ओमान- आमिर कालीम, जतिंदर सिंग (कर्नाधर), हम्मद मिर्झा, विनायक शुक्ला, शाह फैजल, जिंक इस्लाम, आर्यन बिश्ट, मोहम्मद नादेम, शकील अहमद, सामय श्रीवास्तव, जितेन रामानंदी
Comments are closed.