Asia Cup: टीम इंडियाचा भीमपराक्रम, टी20 क्रिकेटमध्ये गाठला अनोखा टप्पा
भारतीय क्रिकेट संघ 2025 च्या टी20 आशिया कपमध्ये चांगली कामगिरी करत आहे, संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून सुपर फोरमध्ये प्रवेश केला आहे. भारताने पहिल्या सामन्यात यूएईचा पराभव केला, त्यानंतर पाकिस्तानवर 7 विकेट्सने विजय मिळवला. भारताचा तिसरा गट सामना ओमानविरुद्ध आहे, जो भारताचा त्यांच्याविरुद्धचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना आहे. सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
ओमानविरुद्धचा सामना हा भारतीय संघाचा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 250 वा सामना आहे. भारत टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 250 किंवा त्याहून अधिक सामने खेळणारा दुसरा संघ बनला आहे. पाकिस्तानने आतापर्यंत एकूण 275 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. भारतीय संघाने आता एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
भारतीय संघाने एकूण 249 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यापैकी 166 जिंकले आहेत आणि 71 गमावले आहेत. सहा सामने बरोबरीत सुटले आहेत आणि सहा सामने अनिर्णित राहिले आहेत.
भारताने दोनदा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आणि 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने टी-20 विश्वचषक जिंकला होता.
ओमानविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांना अंतिम संघातून वगळण्यात आले आहे. अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांना अंतिम संघात स्थान देण्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या आशिया कपमध्ये खेळण्याची अर्शदीपची ही पहिलीच संधी आहे.
Comments are closed.