सॅमसनची शानदार खेळी! भारतानं ओमानसमोर ठेवला 189 धावांचा डोंगर
आशिया कप 2025च्या शेवटच्या साखळी सामन्यात ओमानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 8 गडी गमावून 188 धावा केल्या. शेख झायेद स्टेडियमवर भारताकडून संजू सॅमसनने सर्वाधिक धावा केल्या. संजूने 45 चेंडूत 56 धावा केल्या. ओमानकडून कलीम आणि फैसलने प्रत्येकी 2 बळी घेतले.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताला दुसऱ्या षटकात शुभमन गिलच्या रूपात पहिला धक्का बसला. गिलने 8 चेंडूत 5 धावा केल्या. अभिषेक 15 चेंडूत 38 धावा करून बाद झाला. हार्दिक पांड्या धावबाद झाला. अक्षर पटेलने 12 चेंडूत 26 धावा केल्या. शिवम दुबेने 8 चेंडूत फक्त 5 धावा केल्या. संजू सॅमसनने 45 चेंडूत 56 धावा केल्या. तर तिलक वर्माने 29 धावा केल्या. शेवटी हर्षित राणा 13 धावा करत भारतीय संघाला 180+ धावांपर्यंत पोहोचवले.
या दरम्यान भारतीय संघात विचित्र घटना घडली. फलंदाजी दरम्यान कर्णधार सूूर्यकुमार यादव मात्र शेवटपर्यंत खेळण्यासाठी आलाच नाही. यामागे नेमके कोणतं कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-
भारत: अभिषेक शर्मा, शुबमन गिल, संजू सॅमसन (यशक्रकसन), सूर्यकुमार यादव (कर्नाधर), टिळ वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अकसर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुल्दीप यादव
ओमान- आमिर कालीम, जतिंदर सिंग (कर्नाधर), हम्मद मिर्झा, विनायक शुक्ला, शाह फैजल, जिंक इस्लाम, आर्यन बिश्ट, मोहम्मद नादेम, शकील अहमद, सामय श्रीवास्तव, जितेन रामानंदी
Comments are closed.