नवरात्रा कलश स्थलपना विधी: चांगले मुहर्ट, साहित आणि पूजा विधी

गणेशोत्सवानंतर शारदीय नवरात्री हा देशभरात थाटामाटात साजरा केला जाणारा सण आहे. दरवर्षी शारदीय नवरात्रीची स्थापना अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षाच्या प्रतिपदेला केली जाते. या काळात नऊ दिवस देवीच्या नऊ विविध रुपांची पूजा केली जाते. या काळात भाविक मनोभावे देवीची पूजा करत उपवास करतात. यंदा येत्या 22 सप्टेंबरपासून नवरात्रीची सुरुवात होणार आहे. नवरात्रीत घटस्थापनेच्या विधीचे विशेष महत्व असते. अनेकजण आपल्या घरात कुलदेवीचे घट बसवतात. त्यानिमित्त आपण घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, पूजेसाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घेऊया…( Shardiya Navratri 2025 Kalash Sthapana Shubh Muhurat, Pooja Samagri And Puja Vidhi )

कधीपासून सुरू होत आहे नवरात्री?
आता सर्वात आधी नवरात्री कधीपासून सुरू होत आहे ते जाणून घेऊया… तर हिंदू पंचांगानुसार, या वर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात 22 सप्टेंबर 2025 पासून होणार आहे आणि 2 ऑक्टोबर 2025 रोजी विजयादशमी असणार आहे. आता यंदाचा नवरात्री उत्सव खास असणार आहे कारण हा उत्सव यंदा नऊ नव्हे तर दहा दिवसांचा असणार आहे. त्याचे कारण म्हणजे यंदा तृतीया तिथी ही दोन दिवस असणार आहे. म्हणजेच 24 आणि 25 सप्टेंबर रोजी दोन्ही तृतीया तिथी असेल. त्यामुळेच यंदा 11 व्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा असणार आहे.

घटस्थापनेचा शुभ मुहूर्त
यंदा घटस्थापनेचा शुभ मुहूर्त 22 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 06 वाजून 09 मिनिटांपासून ते सकाळी 08 वाजून 06 मिनिटांपर्यंत असणार आहे. याशिवाय घटस्थापनेचा अभिजित मुहूर्त सकाळी 11 वाजून 49 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजून 38 मिनिटांपर्यंत असेल. अभिजित मुहूर्त हा दिवसाचा सर्वात शुभ काळ असतो. या काळात तुम्ही घटस्थापना करू शकता.

घाटास्थापना पूजा साहित्य

हिंदू धर्मात सर्व शुभ कार्यात कलश स्थापित करणे महत्त्वाचे मानले जाते. हे सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक मानले जाते. घटस्थापनेच्या पूजेत फार कमी साहित्य लागते. प्रत्येकजण आपल्या पद्धतीनुसार हे साहित्य कमी जास्त करू शकते.

  • पंच पल्लव (आंब्याचे पान, पिंपळाचे पान, वडाचे पान, गूळाचे पान, उंबराचे पान) पंच पल्लव उपलब्ध नसल्यास
  • आंब्याची पाने
  • देवीची मूर्ती किंवा फोटो
  • मातीचा दिवा
  • नाणे
  • गहू, ज्वारी किंवा सप्तधान्य
  • स्वच्छ माती
  • मातीचे भांडे
  • कुंकू
  • चिरंतन ज्योतीसाठी पितळेचा दिवा
  • लाल किंवा पिवळे कापड
  • गंगा पाणी
  • कापसाची वात
  • मध
  • कापूर
  • अत्तर
  • तूप
  • हळद
  • गूळ
  • उदबत्ती
  • नैवेद्य
  • सुपारीची पाने
  • नारळ आणि फुले

घटस्थापना पूजा विधी:

  • नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना करताना सर्वप्रथम सर्व देवी-देवतांचे आवाहन करावे.
  • एका मोठ्या मातीच्या भांड्यात माती टाकून त्यात गहू, ज्वारी किंवा सप्तधान्याचे दाणे टाका. त्यावर थोडे पाणी शिंपडा.
  • आता गंगाजलाने भरलेल्या कलशावर रक्षासूत म्हणजेच लाल धागा बांधा. तसेच पाण्यात सुपारी, दुर्वा, अक्षदा आणि नाणे टाकावे.
  • आता कलशाच्या काठावर ५ विड्याची पाने किंवा आंब्याची पाने ठेवा.
  • एक नारळ घेऊन त्याला लाल कापडाने गुंडाळा. नारळावर लाल धागा बांधा.
  • यानंतर कलश आणि धान्याचे मातीचे भांडे स्थापित करण्यासाठी, चौरंग घ्या किंवा प्रथम जमीन पूर्णपणे स्वच्छ करा.
  • यानंतर धान्याचे भांडे ठेवावे. त्यानंतर कलश स्थापित करा आणि नंतर कलशावर नारळ ठेवा.
  • त्यानंतर सर्व देवी-देवतांना आमंत्रण देऊन नवरात्रीची विधिवत पूजा सुरू करा.
  • घट बसवल्यानंतर नऊ दिवस देवघरात सकाळ संध्याकाळ आवश्यकतेनुसार अखंड ज्योत तेवत ठेवण्यासाठी काळजी घ्यावी, आणि धान्याच्या मातीच्या भांड्यात पाणी टाकत राहावे.

Comments are closed.