भिवंडीत शिवसेनेचा निर्धार मेळावा, मतदार याद्यांतील चुका शोधणार

आगामी महापालिका निवडणुकीत भिवंडी पालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे. पालिका निवडणुकीच्या तयारीसाठी आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीला शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग रचना आणि मतदारयाद्या या मुद्यांवरही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

भिवंडी महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची तयारी करण्यासाठी या आढावा बैठकीचे शिवसेना मध्यवर्ती शाखेत आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, उपनेते अल्ताफ शेख, भिवंडी महापालिका पूर्व-पश्चिम विधानसभा संपर्कप्रमुख किशोर पोतदार, भिवंडी पूर्व व पश्चिम शहर जिल्हाप्रमुख मनोज गगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी भिवंडी जिल्हा संघटक वैशाली मेस्त्री, जिल्हा सचिव राजाभाऊ पुण्यार्थी, नितेश दांडेकर, महानगरप्रमुख अरुणा पाटील, मनीष गिरी, कमरुद्दीन शेख, सुरेश पाटील, रमेश धोत्रे, बलराज तिरमदास, अंकुश चव्हाण, मधुकर जाधव, राजेश एरम, लक्ष्मण हुंबारकर, धीरज चव्हाण, विवेक जोशी, व्यंकटेश कर्ली, गणेश घोसके, स्वप्नील जोशी, भाऊ काठवले, विजय कुंभार, अर्जुन कासार, अनिल मच्छा, अंजना संदुपाटला, आलिम शेख, नुरा नाशिककर, अजय तेजे, प्रवीण गुळवी, संतोष विमुल, महेश बोल आदी उपस्थित होते.

मतदार याद्यांतील चुका शोधणार

ठाणे जिल्ह्यातील मतदार याद्यांमध्ये बोगस आणि दुबार नावांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे भिवंडीतील मतदार याद्यांमध्ये झालेल्या चुका शोधण्यासाठी शिवसैनिक या याद्यांचा सखोल अभ्यास करणार आहेत. या चुका तातडीने निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहेत, असे यावेळी शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी सांगितले.

Comments are closed.