पाचशेच्या कोऱ्या करकरीत नोटांचं बंडल बाहेर काढलं अन्…चंद्रकांत पाटील नांदेड विश्रामगृहाच्या आ

नांदेड: राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील (Chandrakant Patil) आपल्या साधेपणासाठी आणि वेगळ्या शैलीसाठी ओळखले जातात. काल रात्री नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात मुक्काम करून सकाळी ते नियोजित कार्यक्रमासाठी निघाले. मात्र गाडीत बसताच त्यांनी अचानक ड्रायव्हरला थांबण्यास सांगितले. त्यानंतर विश्रामगृह व्यवस्थापकांना बोलावून घेत त्यांनी केलेल्या व्यवस्थेचं कौतुक केलं.

नेमकं काय घडलं?

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे नांदेड दौऱ्यावर आहेत. काल रात्री ते नांदेडच्या शासकीय विश्रामगृहावर पोहोचले. रात्री आराम पूर्ण झाल्यावर सकाळी ते नियोजित कार्यक्रमासाठी निघाले. गाडीत बसल्यावर त्यांनी अचानक ड्रायव्हरला थांबण्याचा इशारा केला. विश्रामगृह व्यवस्थापकांना बोलवून घेतले त्यांनी केलेल्या व्यवस्थेचे कौतुक केलं अन् टीप म्हणून संपूर्ण टीमला एकूण 5 हजार रुपयांची बक्षिसी दिली. महत्वाचे म्हणजे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्वतःच्या खिशातून ही पैसे काढून दिले. यामुळे विश्रामगृह कर्मचारी मात्र चकित होत खुश झाले. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. नांदेडच्या शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर ते गाडीत बसलेले असताना त्यांनी पाचशे रूपयांच्या नव्या करकरीत नोटा मोजल्या आणि त्या विश्रामगृह व्यवस्थापकांना बोलवून घेतले त्यांनी केलेल्या व्यवस्थेचे कौतुक केलं आणि ते पैसे त्यांना दिले.

चंद्रकांत पाटील अन् चॉकलेट

मंत्री चंद्रकांत पाटील कोणाच्या लग्नाला गेले, किंवा कोणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले तर ते नेहमी अमूलचे मोठे चॉकलेट (कॅडबरी) देताना दिसतात. मात्र त्यांनी यावेळी व्यवस्थेचे कौतुक केलं अन् टीप म्हणून संपूर्ण टीमला एकूण 5 हजार रुपयांची बक्षिसी दिल्याचं दिसून आलं. या प्रसंगाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नांदेडच्या विश्रामगृहाच्या बाहेर गाडीत बसलेले असतानाच दादा व्यवस्थापकांना नोटा देताना दिसत आहेत. गमतीशीर बाब म्हणजे चंद्रकांत पाटील यांना अनेकदा कोणत्याही लग्नसमारंभात किंवा वाढदिवसाला गेले तर ते अमूलचे मोठे कॅडबरी चॉकलेट भेट देतात. मात्र यावेळी त्यांनी चॉकलेटऐवजी रोख बक्षिस देत कर्मचाऱ्यांचा सन्मान केला.

आणखी वाचा

Comments are closed.