अमेरिकेत जाणं महागलं; ‘एच-1बी’ व्हिसासाठी मोजावे लागणार 88 लाख, ट्रम्प यांच्या निर्णयानं हिंदुस्थानींना झटका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प प्रशासनाने ‘एच-1 बी’ व्हिसासाठी नवीन अटी लागू केल्या आहेत. ‘एच-1 बी’ व्हिसा मिळवण्यासाठी आता प्रतिवर्षी 1 लाख डॉलर (जवळपास 88 लाख रुपये) खर्च करावे लागणार आहेत.

ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका आयटी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांना बसणार आहे. कारण ‘एच-1 बी’ व्हिसाचा सर्वाधिक फायदा हिंदुस्थानींनीच घेतलेला आहे. मात्र आता ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे हा व्हिसा घेऊन अमेरिकेत जाण्याचे आणि तिथे काम करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त ताण पडणार हे स्पष्ट आहे.

विरोधात बातम्या देणारी चॅनल्स बंद होऊ शकतात! ट्रम्प याची उघड धमकी

Comments are closed.