महसूल सेवकांच्या राज्यव्यापी काम बंद आंदोलनाला आठवडा पूर्ण, शासनाकडून साधी दखलही नाही

नागपूर बातम्या: शासनाचा 24 तास नोकर म्हणजेच कोतवाल ज्यांना आता प्रशासकीय वर्तुळात महसूल सेवक म्हटलं जातं, त्या महसूल सेवकांचे राज्यव्यापी काम बंद आंदोलन (Revenue Servant Strike) गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे. राज्यभरात विविध ठिकाणी सुमारे 12 हजार 600 महसूल सेवक काम बंद आंदोलन करत आहेत. तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गृह जिल्ह्यात म्हणजेच नागपुरातील संविधान चौकात शेकडो महसूल सेवक गेल्या आठ दिवस काम बंद आंदोलन करून चतुर्थश्रेणीची मागणी करत आहे.

दरम्यानगेल्या आठ दिवसात त्यांच्या मागण्यांकडे लक्ष घालण्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी प्रशासनातला कुठलाही अधिकारी पोहोचलेला नाही. त्यामुळे महसूल सेवकांनी उद्यापासून त्यांएफ आणि आंदोलन आक्रमक करण्याचा निर्णय घेतला असून सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करून आम्हाला आंदोलनाच्या पेंडॉलमधून उठून रस्त्यावरच्या आंदोलनासाठी मजबूर करत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

महसूल सेवकांचे ग्रामीण भागातील प्रशासनिक कामात काय महत्त्व?

-राज्यात 12, 637 महसूल सेवक आहेत? यात सर्व महसूल सेवकांचे कामबंद आंदोलन सुरू आहे?

– महसूल विभागासाठी महसूल गोळा करणे हा महसूल सेवकाचे प्राथमिक कार्य

-तलाठ्यांना गावपातळीवर विविध महसुली कामात मदत करतात

-महसूल सेवक प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तीच्या वेळेला सर्वात आधी घटनास्थळी जाणारा शासनाचा कर्मचारी असतो

-शिवाय निवडणुकीच्या कामात महसूल सेवकांची भूमिका असते

-विविध गुन्हे किंवा घटना घडल्यास पोलिसांना शासकीय पंच म्हणूनही कोतवाल म्हणजेच महसूल सेवकांची मदत होते

सांगली महापालिकेत एकाच वेळी 475 कर्मचाऱ्यांच्या बदल्या; नेमकं कारण काय?

सांगली महापालिका कामकाजात गतिमानता यावी आणि कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी, या उद्देशाने महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी एकाच वेळी 475 कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. विशेष म्हणजे या बदलांमध्ये पाच वर्षापेक्षा अधिक कालावधी एकाच कार्यालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अनेक कर्मचारी 25 ते 30 वर्षे एकाच विभागात कार्यरत होते. अशा कर्मचाऱ्यांच्या यापूर्वी बदल्या झालेल्या नव्हत्या. त्यामुळे सर्व विभागांचे कामकाज पारदर्शी व्हावे भ्रष्टाचार मुक्त व्हावे आणि कर्मचाऱ्यांना अन्य विभागांच्या कामकाजाचीही माहिती आणि अनुभव मिळावा या उद्देशाने आयुक्त सत्यम गांधी यांनी एका आदेशान्वये 475 अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे वर्षांवरचे तळ ठोकून असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता दुसऱ्या विभागाची वाट पकडावी लागणार आहे.

आणखी वाचा

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद निवडणूक होण्याचा मार्ग जवळपास मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय

आणखी वाचा

Comments are closed.