Vastu Shastra : मंदिराची शिखरे गोल का असतात?

संपूर्ण जगभरात अनेक अलौकिक मंदिरे आहेत. अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा असलेली ही धार्मिक स्थळे कित्येकदा मनात प्रश्न आणि कुतूहल उपस्थित करतात. असाच एक कुतूहलाचा विषय म्हणजे मंदिराची शिखरे. कोणत्याही मंदिराचा घुमट, कळस किंवा शिखरे नीट पाहिली असता तुमच्या लक्षात येईल की, त्यांचा आकार गोल आहे. सौंदर्य आणि भगवंताच्या वैश्विक स्वरूपाचे प्रतिनिधित्व करणारी मंदिराची शिखरे मानवी शरीराच्या शिरोभागाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे त्यांच्या गोलाकार आकारामागे काही विशेष कारणे सांगितली जातात. ती कोणती? जाणून घेऊयात. (Vastu Shastra why temple domes are always in round shape lets learn reason behind)

शास्त्रशुद्ध वास्तूरचना –

देशात उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे अनेक मंदिरांचे शिखर पिरॅमिड टॉवरसारखे दिसते. पण तरीही गोल आकार हा सर्वसामान्य आणि प्रभावी आकार मानला जातो. भारतात मंदिराचे शिखर गोलाकार असणे यामागे अनेक कारणे सांगितली जातात. त्यापैकी एक म्हणजे शास्त्रशुद्ध वास्तूरचना. त्यानुसार, नकारात्मक गोष्टींचा प्रभाव टाळण्यासाठी तसेच नैसर्गिक आपत्तींपासून (जोरदार वारे, वादळ) मंदिराचे संरक्षण करण्यासाठी हा आकार उपयुक्त मानला जातो.

आध्यात्मिक कारणे –

मंदिराचे शिखर हे ईश्वराच्या वैश्विक स्वरूपाचे प्रतिनिधित्व करते, अशी मान्यता आहे. ही शिखरे ब्रह्मांडाचे आणि देवत्वाचे प्रतीक असते. तसेच देवाचे अस्तित्व उंचीमध्ये दडलेले असते. त्यामुळे उंच शिखराकडे पाहताना भक्तांना देवत्वाची अनुभूती होते.

सुंदरतेचे महत्त्व –

मंदिराच्या शिखराचा गोल आकार त्याला एक विशिष्ट सौंदर्य प्रदान करतो. कारण, गोलाकार आकारावरील कोरीव काम अधिक काळ टिकते. त्यामुळे केवळ धार्मिक नव्हे तर कलात्मक दृष्टीनेही या आकाराला विशेष महत्व आहे.

सांस्कृतिक ठेवा –

शिखर म्हणजे मंदिराचा आत्मा. कारण ते मंदिराच्या गर्भगृहावर असते. तसेच या आकारामुळे मंदिर अधिक उंच आणि भव्य वाटते. शिवाय भक्तांसाठी शांतता आणि ध्यानात एकाग्रता वाढवण्यासाठी देखील मदत करते.

वैज्ञानिक कारण –

मंदिराचे शिखर गोल असण्यामागे वैज्ञानिक कारणदेखील आहे. त्यानुसार, गोलाकार आकाराच्या शिखरामुळे मंदिरात हवा खेळती राहते. या रचनेमुळे मंदिराच्या आतील प्रत्येक कोपऱ्यात नैसर्गिक हवा मिळते.

हेही वाचा –

Navratri : कलश स्थापना करताय? वास्तुशास्त्राचे हे नियम आधी वाचा

Comments are closed.