मंत्री अतुल सावेंच्या गाडीवर दगडफेक, एक जण पोलिसांच्या ताब्यात, दगडफेक करणारा मनोरुग्ण असल्याची
अतुल सेव्ह: मंत्री अतुल सावे (Atul Save) यांच्या गाडीवर अचानक दगडफेक (Stone Pelting) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुंडलिकनगरच्या कार्यालयासमोर अतुल सावे यांची गाडी उभी असताना एकाने त्यांच्या दगड फेकून मारला. ही घटना आज शनिवारी (दि. 12) दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Police) एकाला ताब्यात घेतले असून दगडफेक करणारा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अतुल सावे हे आपल्या पुंडलिकनगर कार्यालयात उपस्थित असताना त्यांची गाडी कार्यालयाच्या समोर उभी होती. यावेळी एक तरुणाने अचानक गाडीवर दगड फेकला. दगड गाडीच्या समोरील भागावर आदळल्याने गाडीचे किरकोळ नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.
कार्यालयासमोर गाडी उभी असताना दगडफेक
अतुल सावे यांच्या ड्रायव्हरने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. एका व्यक्तीने अतुल सावे यांच्या पुंडलिक नगर येथील कार्यालयासमोर त्यांची गाडी उभी असताना गाडीवर दगडफेक केली. यावेळी अतुल सावे हे कार्यालयातच उपस्थित होते. अतुल सावे हे कार्यालयातून बाहेर निघण्याच्या तयारीत असतानाच एका व्यक्तीने ही दगडफेक केली.
दगडफेक करणारा मनोरुग्ण
यानंतर तरुणाला स्थानिक लोकांनी ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले. पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. तर हा आरोपी मनोरुग्ण असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत अद्याप मंत्री अतुल सावे यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.