टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत-पाक सामन्यात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज कोण? जाणून घ्या संपूर्ण यादी!

भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातले टी20 सामने नेहमीच क्रिकेटमधले सर्वात रोमांचक आणि चर्चेचे मानले जातात. यामध्ये खेळाडूंची कामगिरी, रेकॉर्ड्स आणि प्रत्येक क्षण चाहत्यांसाठी खूपच आकर्षक ठरतो. भारताकडून अनेक फलंदाजांनी पाकिस्तानविरुद्ध शानदार खेळ करत विक्रम केले आहेत. चला जाणून घेऊया त्या टॉप 5 भारतीय फलंदाजांबद्दल ज्यांनी पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत.

विराट कोहली – 492 धावाटी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला विराट कोहली (Virat Kohli) या यादीत अव्वल आहे. 2012 ते 2024 या काळात खेळलेल्या 11 सामन्यांत त्याने 492 धावा केल्या. त्याचा सरासरी 70.28 तर स्ट्राईक रेट 123.92 असा आहे. कोहलीने 5 अर्धशतकं झळकावली असून पाकिस्तानविरुद्धची त्याची सर्वोच्च खेळी नाबाद 82 धावांची राहिली आहे.

युवराज सिंग – 155 धावाआपल्या काळातील धडाकेबाज फलंदाजांपैकी एक असलेल्या युवराजने पाकिस्तानविरुद्ध 8 सामन्यांत 155 धावा केल्या आहेत. त्याचा सरासरी 25.83 आणि स्ट्राईक रेट 109.92 राहिला. या काळात युवराजने एक अर्धशतक झळकावलं आणि भारताला अनेक महत्त्वाच्या सामन्यांत विजय मिळवून दिला.

गौतम गंभीर – 139 धावासध्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले गौतम गंभीर (Gautam Gambhir) पाकिस्तानविरुद्ध टी20 मध्येही जबरदस्त कामगिरी करून गेला आहेत. 2007 ते 2012 या काळात खेळलेल्या 5 सामन्यांत त्याने 139 धावा केल्या. त्यांची सरासरी 27.80 असून सर्वोच्च खेळी 75 धावांची राहिली.

रोहित शर्मा – 127 धावाआक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) पाकिस्तानविरुद्ध 12 सामन्यांत 127 धावा करून गेला आहे. त्याचा सर्वोच्च स्कोर नाबाद 30 आणि स्ट्राईक रेट 117.59 राहिला. या काळात त्याने 2 अर्धशतकं ठोकली आणि आपल्या खेळीमुळे संघाला स्थिरता दिली.

सूर्यकुमार यादव – 111 धावासध्याचा भारतीय टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) पाकिस्तानविरुद्ध 6 सामन्यांत 111 धावा केल्या आहेत. त्याचा सर्वोच्च स्कोर नाबाद 47 आणि सरासरी 22.20 आहे. सूर्यानं आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध 12 चौकार आणि 2 षटकार लगावले आहेत. आशिया कप 2025 च्या गट फेरीतील सामन्यातही त्याने पाकिस्तानविरुद्ध मॅच विनिंग खेळी केली होती.

Comments are closed.