तुम्ही बाहेरुन आलात, इथं दुकान लावू नका! पुण्यात 10 ते 12 जणांकडून दाम्पत्याला मारहाण

गुन्हेगारीची बातमी ठेवा: पुण्यात (Pune) दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कुठे गोळीबार तर हाणामारी अशा घटना घडत आहेत. आज देखील पुण्यात हाणामारीची घटना घडली आहे. पुण्यातील तुळशीबागेत दुकान लावण्यावरुन हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. 10 ते 12 जणांकडून एका दाम्पत्याला मारहाण करण्यात आली आहे.

दहा वर्षांपासून दुकान लावणाऱ्यांना इथे दुकान लावू नका असे म्हणत 10 ते 12 जणांनी मारहाण केली आहे. तुम्ही बाहेरुन आला आहात तिथे दुकानात लावू नका अशा प्रकारची धमकी दिली आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये काहीजण जखमी देखील झाली आहेत, ज्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत.

महत्वाच्या बातम्या:

धक्कादायक! बीडमध्ये पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू, पत्नीच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

आणखी वाचा

Comments are closed.