महिला क्रिकेटमध्ये इतिहास! वनडे मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध ठोकले 400+ धावा
भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला संघ यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिस हेलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बेथ मूनीच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने 412 धावा केल्या, ज्यात मूनीने 138 धावा केल्या.
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाने भारतीय महिला संघाविरुद्ध 400+ धावा केल्या आहेत. यापूर्वी, कोणत्याही संघाने एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाविरुद्ध हे साध्य केले नव्हते. 412 धावा हा भारतीय महिला संघाविरुद्धचा सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या आहे. यापूर्वी, 2024मध्ये ऑस्ट्रेलियाने भारतीय महिला संघाविरुद्ध 371 धावा केल्या होत्या.
एलिसा हिली आणि जॉर्जिया वॉलने ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. हिली 30 धावांवर बाद झाली. त्यानंतर जॉर्जिया वॉल आणि एलिस पेरीने शानदार फलंदाजी केली. या दोन्ही खेळाडूंनी भारतीय गोलंदाजांना एकही संधी दिली नाही. पेरीने 68 धावा केल्या. तर वॉलने 81 धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर आलेली बेथ मुनी काही वेगळेच विचार करून मैदानात आली. तिने फक्त 75 चेंडूत 138 धावा केल्या, ज्यामध्ये 23 चौकार आणि एक षटकार होता. या खेळाडूंमुळेच ऑस्ट्रेलियन महिला संघ 412 धावांचा टप्पा गाठू शकला.
412 धावा ही ऑस्ट्रेलियन महिला संघाची एकदिवसीय क्रिकेटमध्ये संयुक्त सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी 1997 मध्ये ऑस्ट्रेलियन महिला संघाने पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 412 धावा केल्या होत्या. आता ऑस्ट्रेलियाने स्वतःच्या 28 वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
Comments are closed.