टाळ्या वाजवल्या नाहीत म्हणून चिमुकल्याला मारहाण, व्हिडिओ व्हायरल, शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल

ठाणे उल्सहनगर गुन्हा: उल्हासनगरमध्ये (Ulsahnagar) एका प्री स्कूलमध्ये इंग्रजीत कविता शिकवताना चिमुकल्याने टाळ्या वाजवले नाही म्हणून शिक्षिकेने त्याला मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अखेर या प्रकरणात उल्हासनगर पोलिसांनी शिक्षकेविरोधात  गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उल्हासनगर पोलिसांनी दाखल केला गुन्हा

उल्हासनगर मध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच वायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका चिमुकल्याला कविता शिकवताना शिक्षिका टाळ्या वाजवायला सांगते, मात्र चिमुकला टाळ्या वाजवत नाही. व्हिडिओमध्ये दिसत आहे की शिक्षिकेने या चिमुकल्याला एकदा दोनदा नाहीतर तीनदा मारहाण केली. शेवटी हा चिमुकला शिक्षकेचा हात पकडतो. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उल्हासनगर पोलिसांनी तपास सुरू केला. हा व्हिडिओ उल्हासनगर परिसरातील  एक्सीलेंट किल्ड वर्ल्ड  या प्री स्कूलच्या असल्याचे समोर आले. व्हिडिओची सत्यता समोर आल्यानंतर या प्रकरणात विठ्ठलवाडी पोलिसांनी शिक्षिका गायत्री पात्रा विरोधात बाळ संरक्षण कायदा (75,) गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र या प्रकरणामुळे पालक आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

घटनेनंतर पालक आणि नागरिक चांगलेच संतपाले

उल्हासनगरमधील एका ‘प्री-स्कूल’मध्ये ही घटना घडली आहे. इंग्रजी कविता शिकवताना एका चिमुकल्या विद्यार्थ्याने टाळ्या वाजवल्या नाहीत. याचा राग मनात धरुन  एका शिक्षिकेने त्या छोट्याशा मुलाला मारहाण केली. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पालक आणि नागरिक चांगलेच संतपाल्याचे पाहायला मिळाले. शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यानंतर अखेर त्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेबाबतचा पुढील तपास देखील सुरु आहे.

शिक्षिकेने लहान मुलाला विनाकारण मारलं आहे. एका साईटला घेऊन जाऊन चुमुकल्या लहान मुलाला मारहाण केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा देखील लावण्यात आला नाही. या आधी आमच्या मुलांना किती वेळा असं मारलं असेल? असा सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केला आहे. यामुळं मुलांना भीती वाटेल असंही काही पालक म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण, मंत्रालयातून दखल घेत गंभीर गुन्हा दाखल; तिघांना अटक

आणखी वाचा

Comments are closed.