6 वेळची चॅम्पियन श्रीलंकेला बांगलादेशचा झटका! अखेरच्या षटकात उलथापालथ, आशिया कपच्या फायनलकडे पह

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश एशिया कप 2025 सुपर 4: आशिया कप 2025 मध्ये श्रीलंकेला पहिलाच पराभव पत्करावा लागला. सुपर-4 टप्प्यातील पहिल्याच सामन्यात बांगलादेशने लंकेला 4 गडी राखून धूळ चारली. लीग सामन्यात झालेला पराभव विसरून बांगलादेशने यावेळी श्रीलंकेकडून जबरदस्त बदला घेतला. श्रीलंकेचा ऑलराऊंडर दासुन शनाकाने झंझावाती अर्धशतक ठोकत सामन्याला रंगत आणली होती. पण त्याच्या खेळीवर पाणी फेरत बांगलादेशच्या तौहीद हृदोय आणि सैफ हसन या जोडीने तडाखेबाज फलंदाजी केली. या दोघांनी मिळून अवघ्या 82 चेंडूत 119 धावा फटकावत आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला. (Bangladesh beat Sri Lanka Asia Cup 2025)

तौहीद हृदोय आणि सैफ हसनची जबरदस्त खेळी

169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने 19.5 षटकांत 6 गडी गमावून रोमांचक विजय मिळवला. संघाकडून सलामीवीर सैफ हसनने शानदार खेळी केली. त्याने कर्णधार लिटन दाससोबत दुसऱ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. लिटन दासने 16 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 23 धावा केल्या. तर सैफने फटकेबाजी करत 45 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांसह 61 धावा फटकावल्या.

याचवेळी तौहीद हृदोयनेही तूफानी फलंदाजी केली. त्याने 37 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या जोरावर 58 धावा केल्या. श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगा आणि दासुन शनाका यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तर नुवान तिषारा आणि दुष्मंथा चमीरा यांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

दासुन शनाकाने ठोकले अर्धशतक

याआधी प्रथम फलंदाजी करताना दासुन शनाकाने ठोकलेल्या वादळी अर्धशतकामुळे श्रीलंका 7 गडी गमावून 168 धावांपर्यंत पोहोचली. शनाकाने 37 चेंडूत 6 षटकार आणि 3 चौकारांच्या जोरावर नाबाद 64 धावा ठोकल्या. त्याला साथ देताना यष्टिरक्षक कुसल मेंडिसने 25 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकार मारत 34 धावा केल्या. सलामीवीर पथुम निसांकाने 15 चेंडूत 22 धावा जोडल्या, तर कर्णधार चरिथ असलंकाने 12 चेंडूत 21 धावा काढल्या मात्र तो रनआऊट झाला. बांगलादेशकडून गोलंदाजीत मुस्तफिजुर रहमानने सर्वाधिक 3 बळी मिळवले. मेहदी हसनने 2 गडी टिपले, तर तस्कीन अहमदला 1 विकेट मिळाला.

हे ही वाचा –

SL vs BAN Asia Cup 2025 : आशिया कपच्या सुपर-4 ला सुरुवात अश्रूंनी… श्रीलंकेच्या खेळाडूंच्या हातावर काळी पट्टी! दोन्ही संघ एक मिनिट शांत, प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी!

आणखी वाचा

Comments are closed.